तन्मयची हार्मोनियम फक्त बोलत नाही, चक्क गाते! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

तन्मय देवचके

तन्मयची हार्मोनियम फक्त बोलत नाही, चक्क गाते!

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी दिवसाची सुरुवात वासुदेवाच्या सुरांनी व्हायची, ती आता मोबाईल रिंगटोनमुळे होते, एवढाच काय तो फरक! तरीही त्या रिंगटोनमध्ये संगीत आहे आणि ते रागदारीवर आधारित आहे, याचं प्रात्यक्षिक तन्मय दाखवतो तेव्हा बोजड वाटणाऱ्या रागदारीशी सोयरीक होऊ लागते. प्रेक्षकांमधला रसिक जागा करण्याचे कसब तन्मयकडे आहे. त्याची जादुई बोटं हार्मोनियमवर फिरतात आणि ती चक्क गाऊ लागते. तन्मयला त्याच्या आजोबांकडून हा संगीताचा वारसा मिळाला. खेळणी हाती पडण्याआधी त्याची हार्मोनियमशी मैत्री झाली, मग रीतसर शिक्षण घेतलं आणि आता तो प्रेक्षकांना संगीत साक्षर करत आहे. म्हणूनच की काय, हार्मोनियम जगतातला आज तो आघाडीचा हार्मोनियम वादक म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या सुरांमध्ये चिंब भिजण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा!


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१