प्रत्येक गोष्ट जागच्या जागी – Welcome to Swayam Digital
×

प्रत्येक गोष्ट जागच्या जागी

श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘प्रत्येक गोष्ट जागच्या जागी’ […]
 

Published : 5 September, 2021

प्रत्येक गोष्ट जागच्या जागी

श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

‘प्रत्येक गोष्ट जागच्या जागी’ हा त्यांचा मुक्तचिंतनात्मक स्फुट लेख यशस्वी जीवनाच्या अनेक सूत्रांपैकी एक प्रभावी सूत्र मांडतो. इतिहासांच्या पानांमधून ते उद्याच्या वैश्विक प्रगतीला कवेत घेणाऱ्या मानवाने याची योग्य अंमलबजावणी केली तर त्याचे ईप्सित साध्य होईल हा विचार इथे अधोरेखित केला आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात हे सूत्र वापरता का?

प्रत्येक गोष्ट जागच्या जागी
लेखक : भानू काळे
अभिवाचन : मंदार आपटे - अर्चना गोरे
संदर्भ : नव्या जगाची सुरुवात

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...

हा जयघोष असाच दुमदुमत राहायला हवा

ऑलिंपिक पदकावर नाव कोरण्याचे स्वप्न बघणारे खेळाडू निर्माण करणं हे एक राष्ट्रकर्तव्य आहे. देशाच्या प्रत्येक घटकाचा...