पल्लवी वर्तक
यशाचे शिखर
पल्लवी वर्तक
शालेय जीवनात साहसी खेळांशी ओळख झालेल्या पल्लवी वर्तक यांनी इयत्ता दहावीपासून गिर्यारोहणाला सुरुवात केली. २००१ मध्ये त्यांनी प्रस्तरारोहण - म्हणजे - rock climbing - केलं आणि त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख सह्याद्रीतील सुळक्यांइतकाच उंच उंच जात राहिला ! पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पल्लवी यांनी गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण तर घेतलेच शिवाय इतर महिलांनी या क्षेत्रात यावे यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सह्याद्रीमधील १०० हुन अधिक सुळक्यांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या पल्लवी वर्तक या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत ! क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा 'शिवछत्रपती पुरस्कार 'देऊन महाराष्ट्र शासनाने पल्लवी यांच्या धाडसाला व जिद्दीला सन्मानित केले आहे.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स नाशिक ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video