एकाच ह्या जन्मी जणू – Welcome to Swayam Talks
×

नविन काळे

एकाच ह्या जन्मी जणू

पुनर्जन्माची कल्पना आपण जाणतो. पण ‘एकाच जन्मात पुनर्जन्म’ ही भन्नाट कल्पना सामान्य जगण्याच्या पातळीवर आणून ठेवली तर? गीतकार सुधीर मोघेंनी या तलम अनुभवाला शब्दबद्ध केलं आणि एका सुरेल, दैवी गाण्याचा जन्म झाला. लेखक नविन काळे त्यांच्या ‘एकाच ह्या जन्मी जणू’ या लेखात त्या दिव्यत्वाचा शोध घेताना त्यात हरवून जातात. अशाच स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हीही नक्की ऐकावा असा हा नवा पॉडकास्ट.

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

एकाच ह्या जन्मी जणू
लेखक : नविन काळे
अभिवाचन : ग्रीष्मा बेहेरे
संदर्भ : सॉंग ऑफ द डे
प्रकाशन : राफ्टर पब्लिकेशन्स

Thumbnail Design: सुमेध रानडे
शीर्षक संगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

समृद्ध श्रवणानंदासाठी मूळ गाण्यातील काही भाग या पॉडकास्टमध्ये वापरण्यात आला आहे. त्याचे श्रेय गाण्याच्या मूळ निर्मात्यांना आहे आणि त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.


Trending Now

Swayam Recommends

Swayam Podcast

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१