सुशांत फडणीस
कोल्हापूर ते कॅनडा व्हाया वाशी मार्केट (मुलाखत)
सुशांत फडणीस
कोल्हापूरमध्ये लहानाचं मोठं झालेल्या सुशांत यांना लहानपणापासूनच ‘धंद्याचं’ बाळकडू मिळालं. बारावी झाल्यावर शिक्षणाला चक्क रामराम ठोकून सुशांत यांनी स्वतःचा व्यवसाय करायचा धाडसी निर्णय घेतला. सुशांत यांनी अतिशय कमी वयात भाज्या व फळांच्या निर्यातीच्या व्यवसायात उडी घेतली. धंद्यातील तोटे, फसवणूक, मालाची नासाडी इ. अनेक अडचणींवर मात करुन सुशांत फडणीस यांनी आज भाज्या व फळे निर्यात बाजारात स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. सुशांत यांच्या कंपनीतर्फे निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्या व फळे आज अफगाणिस्तान, मध्य आशिया, पूर्व आशिया, युरोप तसेच कॅनडा इ. देशांतील बाजारपेठांमध्ये जात असल्यामुळे आपल्या देशातील स्थानिक शेतकरी व बागायतदारांना चांगला भाव मिळत आहे. आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे सुशांत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना त्यांच्या यशाचा मंत्र देत आहेत.
सुशांत फडणीस यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात केले गेले आहे.