सुमन मोरे
‘स्वच्छ भारत’ अभियानाचा खऱ्याखुऱ्या राजदूत (मुलाखत)
सुमन मोरे
मराठवाड्यातील बीडमध्ये जन्मलेल्या आणि लग्नानंतर पुण्यामध्ये आलेल्या श्रीमती सुमन मोरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भंगार वेचून उदरनिर्वाह केला. अत्यंत कष्टपूर्ण जीवन जगत गरिबीच्या अवस्थेतही त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. नंतर 'कागद काच पत्रा' कष्टकरी पंचायतीचे सदस्यत्व स्वीकारून कचरावेचक पुरुष आणि महिला यांच्यासाठी काम केले. कचरा वेचून आपली गुजराण करणाऱ्या एका मोठ्या वर्गाच्या त्या प्रतिनिधी बनल्या. सुमन मोरे या कचरा वेचक आणि कष्टकरी यांच्या समस्या मांडण्यासाठी नेपाळ, साऊथ आफ्रिका आणि जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे जाऊन आल्या आहेत. त्यांना आजवर बावीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्या पुणे महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रॅंड अँबेसिडर आहेत. एवढेच नव्हे, तर जगातील श्रेष्ठ दर्जाच्या एका युनिव्हर्सिटीच्या एका पुस्तकात त्यांचा धडा अभ्यासाला आहे. कचरा वेचकांच्या या चळवळीचा सुमन मोरे चेहरा बनल्या आहेत. ऐकूया त्यांच्या जिद्दीचा हा जगावेगळा प्रवास खुद्द त्यांच्याच तोंडून आणि सोबत त्यांचे सुपुत्र लक्ष्मण मोरे
सुमन मोरे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.