शिल्पा मैंदर्गी व धनश्री आपटे
नृत्यांगना धनश्री आपटेंनी घडवले ‘शिल्पा’ तून शिल्प
शिल्पा मैंदर्गी व धनश्री आपटे
शिल्पा मैंदर्गी हिने वयाच्या पाचव्या वर्षी दृष्टी गमावली, तेव्हा मनावर कोरली गेलेली शेवटची छबी म्हणजे भरतनाट्यम करणारी नृत्यांगना! मोठेपणी आपणही तसेच व्हायचे हा ध्यास घेत तिची गाठ पडली धनश्री आपटे या नृत्यशिक्षिकेशी! तिथून सुरू झाला एक प्रवास जिद्दीचा! जिद्द शिकण्याची आणि शिकवण्याची...वात्सल्य, भक्ति, शृंगार हे भाव शिल्पाने कधी पाहिले नाहीत, तरी ते नृत्यातून अचूकपणे कसे दाखवायचे याचा धनश्री ताईंनी केलेला अभ्यास आणि त्यात मिळालेले यश म्हणजे तारेवरची कसरतच! २७ वर्षांच्या सहवासात 'गुरु कोण शिष्य कोण' हा प्रश्न पडावा एवढी एकरूपता लाभलेली जोडी आणि त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली सबंध मुलाखत नक्की पहा.