पुष्कर औरंगाबादकर
कॉर्पोरेट कीर्तन
पुष्कर औरंगाबादकर
कीर्तनाची समृद्ध परंपरा लाभलेल्या पुण्याच्या ‘औरंगाबादकर’ घराण्यात पुष्कर यांचा जन्म झाला. त्यांच्या आधीच्या आठ पिढ्या कीर्तनकार असल्यामुळे कीर्तनाचे बाळकडू त्यांना मिळाले नसते, तरच नवल. उच्चशिक्षणात ‘मॅनेजमेंट’चा अभ्यास करताना, ‘मॅनेजमेंट’मधील तत्वे आणि आपल्याला अवगत असलेली कीर्तनकला यांची काही सांगड घालता येईल का, यावर विचार करत पुष्कर यांनी प्रदीर्घ अभ्यास केला. आपल्या विचारांचा पाठपुरावा करत पुष्कर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि आता त्यांना ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ अशी उपाधी मिळाली आहे. आधुनिक मॅनेजमेंट आणि पारंपारिक कीर्तन यांची पुष्कर यांनी घातलेली सांगड पाहून तुम्ही थक्क व्हाल !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१७ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video