प्रसन्न पटवर्धन
प्रगती फास्ट प्रसन्न ट्रॅव्हल्स (मुलाखत)
प्रसन्न पटवर्धन
पारंपरिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या असंख्य कंपनी आहेत आणि त्यातल्या अनेक बऱ्यापैकी यशस्वीसुद्धा आहेत. परंतु प्रवासी वाहतुकीत नावीन्यपूर्ण बदल घडवत ह्या व्यवसायाला एका अद्भुत उंचीवर नेणारे ‘Prasanna-Purple’ चे निर्माते प्रसन्न पटवर्धन सांगताहेत त्यांच्या वेगवान आयुष्याची भन्नाट गोष्ट. अवघ्या दोन बस घेऊन व्यवसायात उतरलेल्या प्रसन्न ट्रॅव्हल्सकडे आज हजारापेक्षा जास्त बसेसचा ताफा आहे आणि अत्याधुनिक सुविधा वापरुन त्यांनी ग्राहकांना एक वेगळा प्रवासी आनंद दिला आहेच पण त्यासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब करत व्यवसायवृद्धीही केली आहे. यांची ही यशोगाथा ऐकूया खुद्द प्रसन्न पटवर्धन यांच्याकडून. त्यांची मुलाखत घेतली आहे स्वयंचे सुसंवादक डॉ. उदय निरगुडकर ह्यांनी.
प्रसन्न पटवर्धन यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे ‘पगारिया ऑटो’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स छत्रपती संभाजीनगर २०२२’ ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
अस्वीकृती (Disclaimer)
‘स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.