प्रणाली चिकटे
१ महाराष्ट्र २ चाकं ४३५ दिवस! (मुलाखत)
प्रणाली चिकटे
यवतमाळजवळच्या एका छोट्याशा खेड्यातली एका गरीब शेतकरी कुटुंबातील एक मुलगी, अवघ्या २० वर्षांची. आईवडिलांना शेतीत मदत करता करताच शिक्षण घेणारी. अचानक एक दिवस घरच्यांना काहीही न सांगताच घराबाहेर पडते आणि 'स्वतःचा शोध' घेण्यासाठी महाराष्ट्रभर भटकंती करते. फक्त एक सायकल घेऊन ती सलग ४३५ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालते. तिचा शोध नेमका कसला होता? तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे सापडली का? तिला कोणते अनुभव आले? तिच्या ह्या अद्भुत प्रवासाची रंजक कहाणी आपल्याला सांगतेय प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे. तिचा हा दोन चाकांवरचा झपाटलेला प्रवास तुम्हाला थक्क करुन टाकेल.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video