Ep1. Marketing v/s Advertising - Welcome to Swayam Talks
×

उमेश श्रीखंडे

Ep1. Marketing v/s Advertising

Marketing ही संकल्पना काय आणि तिची व्याप्ती किती? ती कला आहे की शास्त्र? Branding म्हणजे नेमकं काय? एखाद्या
व्यवसायाला ह्या सर्व गोष्टींचा काय आणि कसा उपयोग होतो? केवळ जाहिरात करणे म्हणजे मार्केटिंग असते की त्याहून अधिक काही असते? काही कंपन्या ग्राहकांच्या मनात त्यांचा अमिट ठसा उमटवतात. अगदी शंभराहून अधिक वर्षे त्या टिकून राहतात. यात त्यांच्या मार्केटिंग तंत्राचे योगदान किती असते? नव्या युगातील मार्केटिंगचा चेहरा बदललाय का? एकंदर हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही हे नक्की. पण उत्तम व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंगला पर्याय नाही.

आपल्या मनातल्या अशा अनेक समजुती आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलो आहोत, आमच्या ‘मार्केटिंग मंत्र’ ह्या सहा भागांच्या नव्या व्हिडिओ सिरीज मधून. Marketing आणि Branding ह्या गुंतागुतीच्या प्रक्रियेविषयी आपल्याला सांगताहेत जाहिरात क्षेत्रातील दिग्गज श्री उमेश श्रीखंडे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय श्री नीरज गांगल यांनी.

उमेश श्रीखंडे हे भारतीय जाहिरात क्षेत्रात एक महत्वाचे नाव मानले जाते. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA चे शिक्षण घेतलेले उमेश नुकतेच Taproot Dentsu या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीच्या CEO पदावरून निवृत्त झाले आहेत.

गेल्या तीस वर्षात बजाज ऑटो, शॉपर्स स्टॉप, फिलिप्स, एशियन पेन्ट्स, कॅडबरी, फेसबुक, उबर, मॅरिको, युरेका फोर्ब्स, डिस्ने, आयटीसी, पार्ले, सॅमसोनाइट अशा अनेक नामांकित तसेच जागतिक ब्रँड्सच्या जडणघडणीत उमेश यांचे योगदान अमूल्य आहे. Contract आणि Taproot Dentsu ह्या दोन कंपन्यांच्या आजवरच्या जडणघडणीतदेखील त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

Episode 1: Marketing Vs. Advertising
Marketing हे एक सखोल शास्त्र असून ग्राहकांशी नातं जोडण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. ते उत्तम पद्धतीने कसं वापरावं याविषयी उमेश श्रीखंडे यांच्याकडून जाणून घेऊया ह्या पहिल्या भागात.

Episode 2: Brand and Brand Positioning
ज्या उत्पादनांमुळे प्रभावित होऊन ग्राहक त्याविषयी आस्थेने बोलू लागतात तो Brand होतो आणि मार्केटमध्ये त्याने निर्माण केलेली जागा म्हणजेच Brand Positioning. हे कसं निर्माण करावं?ह्याविषयी ह्या दुसऱ्या भागात आपल्याला मार्गदर्शन करताहेत उमेश श्रीखंडे

Episode 3: Brand Personality
Brand चं व्यक्तिमत्व हे केवळ जाहिरात किंवा प्रचारातून निर्माण होत नसतं. तर तुम्ही निर्माण करत असलेल्या वस्तू आणि सेवा यांच्या अंगभूत सामर्थ्यावर ते अवलंबून असतं. उमेश श्रीखंडे यांच्या तज्ज्ञ दृष्टीतून त्याचा अभ्यास करुया ह्या तिसऱ्या भागात.

Episode 4: Marketing Process
मार्केटिंग ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि किंमत यासोबतच मार्केटिंगमधील ऊर्जा, कल्पनाशक्ती, प्रेरणा आणि संवेदनशीलता हे देखील महत्त्वाचे असते. उमेश श्रीखंडे ह्या विविध पैलूंवर अधिक प्रकाश टाकताहेत ह्या चौथ्या भागात.

Episode 5: Customer Centricity
ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याविषयी दक्ष असणारी कंपनी म्हणजेच Cusotmer Centric Company होय. अशी कंपनी बनण्यासाठी काय करावे लागते याचे विवेचन करताहेत उमेश श्रीखंडे ह्या पाचव्या भागात.

Episode 6: Digital Advertising
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रभावी डिजिटल मार्केटिंग करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. ही गरज ओळखून नव्या सुरांशी जुळवून घेण्याचा मंत्र देताहेत उमेश श्रीखंडे ह्या सहाव्या आणि अखेरच्या भागात.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१