डॉ. मेधा ताडपत्रीकर
टाकाऊ प्लॅस्टिक ते उपयुक्त इंधन
डॉ. मेधा ताडपत्रीकर
आपण रोज आपल्या घरातून किती प्लॅस्टिक बाहेर टाकून देतो त्याची गणतीच नाही. त्याने पर्यावरणाची अपरिमित हानी होत असते याची आपल्याला गंधवार्ताही नसते. मात्र हेच टाकाऊ प्लस्टिक वापरून त्यापासून इंधन निर्माण करता येऊ शकते हे दाखवून दिलं डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे ह्यांनी. Plastic to Polyfuel हे जगावेगळं Upcycling करणारी उद्योजक द्वयी आता त्यांची गोष्ट तुम्हाला सांगायला येतेय. जरूर ऐका
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे ‘पगारिया ऑटो’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स छत्रपती संभाजीनगर २०२२’ ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
अस्वीकृती (Disclaimer)
‘स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.