मंदार भारदे
मी विमाने-हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो !
मंदार भारदे
महाविद्यालयीन जीवनात मंदार यांनी पत्रकार, स्तंभलेखक, वृत्तनिवेदक अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात सक्रीय सहभाग असलेल्रा मंदार यांनी काही माहितीपटांचीही निर्मिती केली. अशाच एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी मंदार यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला होता. त्याच वेळी त्यांच्या मनात हेलिकॉप्टर, विमाने या विषयी कुतूहल चाळवले. याच कुतूहलातून MAB Aviation या कंपनीची निर्मिती झाली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विमाने व हेलिकॉप्टर्स भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचे काम ही कंपनी करते. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, बड्या उद्योग समूहांचे अध्यक्ष, राजकारणी नेते, अभिनेते, धर्मगुरू, इ. अनेक महत्वाची मंडळी या सेवेचा लाभ घेत असतात. राजकीय पक्षांसाठी election war room ही मंदार यांची संकल्पना निवडणूक व्यवस्थापनात नावाजली गेली. 'आयुष्यात नक्की कुठलं करियर निवडायचं?' हा प्रश्न ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा पडतो, त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहायलाच हवा!
सदर व्हिडीओचे चित्रीकरण ''स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१५' या कार्यक्रमात केले गेले आहे.