किआरा अरान्हा
होमस्कूलिंग का करावं? याची पाच मुख्य कारणं ऐका!
किआरा अरान्हा
धोपटमार्ग सोडून वेगळा मार्ग निवडायला आणि त्यावरून प्रवास सुरू ठेवत ध्येय गाठायला धाडस लागतं! होमस्कूलिंगचा अनवट मार्ग १३ वर्षांच्या कियारालासुद्धा मान्य नव्हता. तरीसुद्धा वर्षभर प्रयोग म्हणून तिने घेतलेला अनुभव, त्यामुळे समृद्ध झालेलं तिचं जीवन आणि बालवयात आलेली प्रगल्भता कौतुकास्पद आहे. तिचा पिंड जिज्ञासू असल्याने तिने होमस्कूलिंगच्या स्वातंत्र्याचा पूर्णत: उपयोग कसा केला? कोणकोणते अनुभव घेतले? तिला मित्रमैत्रीणिंची उणीव भासली का? स्वभावात एकलकोंडेपणा आला का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कियाराच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यातून मिळतात. होमस्कूलिंग का करावं? हे ती पाच मुद्द्यात पटवून देते. ते ऐकण्यासाठी हा छोटासा पण महत्त्वाचा व्हिडिओ नक्की ऐका! हा मूळ टॉक इंग्लिश भाषेत आहे, याची नोंद घ्यावी.
Related Video