चिन्मय तुंबे
माणसं स्थलांतर का करतात? (मुलाखत)
चिन्मय तुंबे
आपण पाहतो की जगण्यासाठी पोटाला अन्न हवं आणि म्हणून केवळ त्या एका कारणासाठी, वाट्टेल त्या संकटांना तोंड देत जगभर पशुपक्ष्यांची स्थलांतर घडत असतात!..गेली हज्जारो वर्षं!..नित्यनेमानं! गंमत म्हणजे केवळ अन्नासाठी तसं करण्याची तितकी गरज नसलेला मानवसुद्धा गेली हजारो वर्षं आपलं राहतं स्थान सोडून स्थलांतर करत आलाच आहे! पण आपण कधी हा विचार केलाय की पशुपक्ष्यांपेक्षा भलताच उत्क्रांत असणाऱ्या मानवाच्या स्थलांतरामागे काय कारणं असू शकतील? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमधले असिस्टंट प्रोफेसर चिन्मय तुंबे यांना नेमक्या ह्याच विषयांची भुरळ पडली आणि हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनला. चिन्मय तुंबे यांनी त्यांच्या ओघवत्या, रसभरीत शैलीत हा प्रथमदर्शी गंभीर वाटणारा विषय आणि त्यानुषंगाने 'मानवी समूहांच्या स्थलांतरामागची कारणं, त्यामागची मानसिकता आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम' अशा सर्वच बाबींवर अत्यंत सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय!
चिन्मय तुंबे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी
सदर व्हिडीओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात झाले आहे.