बाळासाहेब कापसे
100+ मूकबधिर मुलांना पैठणी विणायला शिकवणारे उद्योजक- मुलाखत
बाळासाहेब कापसे
पैठणी साडी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू! या पैठणी साडीचा व्यवसाय अनेक जण करतात. पण हा व्यवसाय यशस्वी करुन त्या यशात मूकबधिर, आदिवासी आणि अनाथ मुलांनाही भागीदार करुन ‘कापसे पैठणी’ने सामाजिक उद्यमशीलतेचे एक अद्वितीय मॉडेल उभे केले आहे. ‘स्वयं टॉक्स’च्या व्यासपीठावर कापसे पैठणीचे संस्थापक बाळासाहेब कापसे यांनी आपला संपूर्ण प्रवास उलगडून दाखवताना खरी पैठणी कशी ओळखायची इथपासून ते त्यांच्या ‘कोट्याधीश’ यशाचे गमक अशा अनेक विषयांवर अत्यंत मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय डॉ उदय निरगुडकर यांनी. ग्रामीण भागातून आलेला एक माणूस मेहनत आणि इच्छाशक्ती यांना संवेदनशीलता जोडतो तेव्हा काय चमत्कार होतो, हे अनुभवण्यासाठी तुम्हाला ही मुलाखत बघायलाच हवी!
बाळासाहेब कापसे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.