अश्विन चितळे
मराठीतले ‘हे’ शब्द फारसी भाषेतून आलेत, माहितीये का?
अश्विन चितळे
शालेय वयापासून 'भाषा' हा विषय आपण पर्याय म्हणून दुर्लक्षित करतो. कारण, त्यात फारसे करिअर ऑप्शन नाहीत. ज्या परदेशी भाषा शिकल्या जातात, त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे भाषेवर प्रेम जडणं आणि त्याचं सौंदर्य पाहता येणं या अवस्थेपर्यंत फार कमी भाषा अभ्यासक पोहोचतात. पुण्याचा अश्विन चितळे हा त्या रसिकांपैकी एक! त्याने फारसी भाषेच्या डोहात नुसती उडी घेतली नाही, तर त्यातली शब्द रत्न वेचून तो परत मायमराठीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचला आहे. फारसी शिकणं, शिकवणं आणि भाषेचा आस्वाद घेत साहित्य, संस्कृतीची ओळख करून घेणं, हा अश्विनचा छंद आहे. मराठीतले अनेक शब्द मूळचे मराठी नाहीत, हे त्याच्याकडून ऐकताना आपण आश्चर्यचकित होतो आणि या शब्दांचा, भाषांचा प्रवाह संस्कृत भाषेला जाऊन मिळतो, हे कळल्यावर सुखावतो. असा हा फारसी भाषेचा प्रवास अश्विन चितळेच्या आम्रखंडासारख्या गोड आणि बाकरवडीसारख्या खमंग, खुशखुशीत शैलीत ऐकायचा असेल तर संपूर्ण व्हिडीओ बघायलाच हवा!
Related Video