                                सारंग गोसावी
काश्मीरशी ‘असीम’ मैत्री!
सारंग गोसावी
आर्मी जनरल पाटणकरांच्या भाषणाने भारावून गेलेला ऐन पंचविशीतला एक तरुण एका विलक्षण जिद्दीने झपाटून उठतो आणि थेट कश्मीरमध्ये जाऊन धडकतो. पाहता पाहता तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करतो. "असीम फौंडेशन"च्या आपल्या सहकाऱ्यांमध्ये आणि कश्मीरच्या युवकांमध्ये एक अद्भुत मैत्रीबंध निर्माण करतो कश्मीरखोऱ्याच्या आडगांवांत आणि तिथल्या अनोळखी लोकांच्या घरी जाऊन राहण्याचं धाडस दाखवत, अडचणी डोक्यात न ठेवता हा बिनधास्त आपले पुण्यातले मित्रमैत्रिणी घेऊन तिथे जाऊन शाळा, कॉम्प्युटर लॅब चालवतो, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी घेतो… सफरचंदच्या आणि अक्रोडाच्या बिस्कीटं निर्मितीला आणि विक्रीला साहाय्य करतो आणि इतरही बरेच कायकाय उपक्रम करत राहतो! नुकतंच त्याने लडाखमध्ये ‘सायन्स पार्क’सुद्धा सुरु केलंय!
भेटूया असीम फौंडेशनच्या सारंग गोसावीला...
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पोलाद प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० कार्यक्रमात झाले आहे.
Related Video