अभिमानास्पद महाराष्ट्र #2
Intere’string’ मिरज
अभिमानास्पद महाराष्ट्र #2
अनेक शास्त्रीय गायक आणि वादकांसाठी मिरज हे जणू वाद्यांचं माहेरघर. भारतीय शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा जपण्याचं आणि तो तसाच पुढील पिढ्यांच्या हाती सुपूर्द करण्याचं काम गेली कित्येक वर्षं मिरजेची शिकलगार कुटुंबं करतायत. आपल्या हातांनी प्रत्येक वाद्य घडवणं, सुरावटीला बांधून ठेवणं ही परंपरा कायम ठेवत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देत ही कुटुंबं महाराष्ट्राला भारतीय संगीत संस्कृतीच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवून देतायत. हीच 'अभिमानास्पद' गोष्ट सांगणाऱ्या या फिल्ममध्ये मिरज शहराची ही कामगिरी लोकांसमोर उलगडून दाखवतायत ख्यातनाम गायक राहुल देशपांडे !