आभा चौबळ
देशविदेशात फिरणारी सोलो ट्रॅव्हेलर
आभा चौबळ
सहलीला जाताना प्रवास खर्च एकवेळ परवडेलही, पण बाहेरगावी राहण्या-खाण्याचाच खर्च फार असतो. त्यामुळे दोन-तीन दिवसात गाशा गुंडाळून माघारी फिरावं लागतं. मात्र सोलो ट्रॅव्हेलर आभा चौबळ सांगतेय वर्क अवे पद्धतीबद्दल. जिथे काम करून खाण्याचा आणि राहण्याचा प्रश्न सुटतो आणि विविध देशांची, शहरांची मनसोक्त भ्रमंती करता येते. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर कळेलच, पण त्याआधी आपण 'वेळ नाही' ही सबब खोडून टाकायला हवी. आधी जनात फिरायला हवं, मग आपोआपच मनात भ्रमंती सुरु होते. 'केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार' असं समर्थ रामदास स्वामी म्हणाले ते उगीच नाही. या भ्रमंतीत कोणकोणते हिरे, पाचू, मोती आपल्या हाती लागू शकतात, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच बघायला हवा!
Related Video