मनDay with अनघा- Season२ Ep१३ अष्टभुजा नारायणी - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक सुवर्णा रावल

मनDay with अनघा- Season२ Ep१३ अष्टभुजा नारायणी

नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीचा उत्सव. स्त्रीशक्तीच्या विविध रुपांचा महोत्सव. तिच्या सशक्तीचं दर्शन डोळे दिपवून टाकणारं. अशाच एका स्वयंसिद्धेचं दर्शन घेऊया. अत्यंत खडतर परिस्थितीतून स्वतःचं आयुष्य घडविल्यानंतर इतरांच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणारी ही विद्युल्लता. भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आपलं आयुष्य वेचणारी. त्यांचं नाव डॉ सुवर्णा रावळ. एका वेगळ्या वाटेवरच्या मुक्तेचं हे आत्मचिंतन घेऊन येतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या नवरात्री विशेष भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘अष्टभुजा नारायणी’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१