नविन काळे
गप्पा
नविन काळे
‘गप्पा’ हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मित्रमैत्रिणींच्या कोंड्याळ्यात बसून चवीने मारलेल्या विविध विषयांवरच्या मनमुराद गप्पा म्हणजे ब्रह्मानंदाची अनुभूतीच जणू. तो माहौलच वेगळा. नविन काळे त्यांच्या ‘गप्पा’ या लेखात त्यांच्या आयु्ष्यातल्या अशा अनेक गप्पांचे संदर्भ देतात आणि ते आपल्यालाही अगदी तसेच लागू होतात. वरकरणी निरर्थक वाटणाऱ्या गप्पांमधून अर्थपूर्ण जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सापडतो.
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
या चटपटीत लेखाचं अभिवाचन केलंय सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांनी. त्यांच्या खुमासदार शैलीत ह्या गप्पा ऐकणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. तुमचंही या गप्पांमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग … येताय ना? ‘गप्पा’ मारायला !
गप्पा
लेखक : नविन काळे
अभिवाचन : अविनाश नारकर
Thumbnail Design: सुमेध रानडे