आभा चौबळ
मुलाखत- आभा चौबळ आणि डॉ. उदय निरगुडकर
आभा चौबळ
प्रवासाची आवड आहे पण सवड नाही, असं म्हणणारे आपण प्रवास वर्णनं वाचण्यात रमतो. पण आवड असली तर सवड मिळते आणि निवडही योग्य प्रकारे कशी करता येते, याची उकल झालेली एकल महिला प्रवासी म्हणजे आभा चौबळ. प्रवास माणसाला समृद्ध कसा करतो हे तिच्याकडून ऐकताना जाणवतं. आपण सगळेच वेगवेगळे मुखवटे घेऊन समाजात वावरतो, पण स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर एकट्याने प्रवास करायला हवा. माणसं जोडायला हवी, समजून घ्यायला हवी, निसर्ग सौंदर्य टिपायला हवं आणि या आठवणींचं संग्रहालय मनात बांधायला हवं! मात्र हे सगळं करताना तिला महिला प्रवासी म्हणून काही अडचणी आल्या का? राहण्या खाण्याचा प्रश्न तिने वेळोवेळी कसा सोडवला? आर्थिक गणित कसं जुळवलं, इ. प्रश्न विचारत डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आणि त्यावर तिने दिलखुलासपणे दिलेली उत्तरं तुम्हालाही चिंतन करायला लावतील, हे नक्की!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई २०२४ ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.