धनश्री लेले
सर्वश्रेष्ठ धन कुठलं?
धनश्री लेले
महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
आपल्या 'यक्षप्रश्न' मालिकेतला चौथा प्रश्न आहे, सर्वश्रेष्ठ धन कुठलं?
ऐकुया, या प्रश्नाचं धर्मराजांनी काय उत्तर दिलं आणि त्यावरील धनश्री ताईंचे निरूपण !
यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.