प्राची शेवगांवकर
माझ्या App मुळे एक लाख झाडे वाचली !(मुलाखत)
प्राची शेवगांवकर
"#ClimateChange ही आज संपूर्ण जगाला भेडसावणारी पण एक अदृश्य समस्या आहे. या समस्येवर जर 'आज' उत्तर शोधलं नाही तर ही मानवजात येणारा 'उद्या' पाहू शकणार नाही असं पुण्यातल्या एका तेवीस वर्षांच्या मुलीला वाटलं.
'परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून' या विचाराने या मुलीने स्वतःच्या आयुष्यात तर बदल केलेच, पण एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती करून या मुलीने एकशे दहा देशांतील लोकांच्या मदतीने २५ लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केलीय.
या Marathi Video मध्ये, ती तिच्या Inspirational Stories बद्दल बोलत आहे, ज्यामुळे तिला #CoolTheGlobe या Mobile App ची कल्पना सुचली.
Cool The Globe App तयार करणाऱ्या 'Cool' प्राची शेवगांवकरचा हा Talk तुम्हाला Climate Change समस्येवर तुमच्यापुरतं उत्तर शोधण्यास नक्की मदत करेल.
आणि हा Marathi Video तुम्हाला Global Warming च्या विरोधात पाऊले टाकण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
प्राची शेवगांवकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी. सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.