सोनाली नवांगुळ
अपंगांनी Sexuality चा विचार करण्यात गैर काय?
सोनाली नवांगुळ
आपल्याकडे अपंग व्यक्तीकडे पाहण्याचे दृष्टिकोनही ठोकळेबाज झालेत. अपंग म्हणजे करुणा, सहानुभूती आणि त्याही पुढे जात प्रेरणेचं एक चालतं बोलतं स्मारक ! पण अपंग व्यक्ती ही सुद्धा एक माणूस आहे, त्या व्यक्तीलाही इतर माणसांप्रमाणे भावना आहेत हे आपण विसरतो. माणसाच्या आदिम भावनेपैकी एक सर्वात महत्त्वाची भावना म्हणजे लैंगिक भावना ! अपंगांना सुद्धा लैंगिक भावना असतात, त्या भावनांचा निचरा करण्याची गरज असते या गोष्टींचा समाज म्हणून आपल्याला विसर पडतो. नेमक्या याच नाजूक मुद्द्यावर बोट ठेवलंय साहित्य अकादमी विजेती लेखिका सोनाली नवांगुळ हिने. सोनालीचा हा टॉक तुम्हाला अक्षरशः हलवून सोडेल. अपंगांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा हा टॉक प्रत्येकाने ऐकायलाच हवा !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Related Video