मंदार आपटे
गॅंगस्टर्सना मेडिटेशन शिकवणारा शांतिदूत (मुलाखत)
मंदार आपटे
If Violence Can Be A Business, Why Can't Peace Be? जर हिंसा हा काही लोकांचा धंदा होऊ शकतो तर 'शांती' हा एक उद्योग का होऊ शकत नाही? असे भन्नाट विचार असलेल्या मुंबईच्या मंदार आपटे यांचा हा टॉक तुम्ही ऐकायलाच हवा. ध्यान धारणेचा स्वतः अभ्यास करत असताना मंदार यांनी अमेरिकेतील आपल्या कंपनीतील काही लोकांना 'मेडिटेशन'चे धडे द्यायला सुरुवात केली. त्या लोकांमध्ये होणारे आमूलाग्र आंतरिक बदल पाहून मंदार यांच्या मनात प्रश्न आला - मेडिटेशनमुळे जर आंतरिक शांती मिळत असेल, तर हेच धडे आपण गुन्हेगार / गॅंगस्टर्सना दिले तर त्यांच्यात काही फरक पडेल का? याच कल्पनेतून मंदार यांनी Peace Foundation ची स्थापना केली.
आज मंदार अमेरिकेतील पोलीस, गुन्हेगार, हिंसेचे बळी, गॅंगस्टर्स यांना मेडिटेशनचे धडे देत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास मदत करत आहेत.
ह्या मराठी #Video द्वारे, मंदार आपटे ह्यांच्या Real-life मधील #Motivational Story मधून आपल्याला प्रेरणा मिळते.
ह्या Marathi Motivational Video मध्ये ते #Meditation च्या फायद्यांबद्दल देखील बोलतात.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
मंदार आपटे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.