चिंतामणी हसबनीस
क्लोज्ड आईज ओपन माइंडस
चिंतामणी हसबनीस
चिंतामणी हसबनीस यांनी ‘डिप्लोमा इन फाईन आर्ट’ हा अभ्यासक्रम गुणवत्ता यादीत झळकत पूर्ण केला. पुढे ‘फाईन आर्ट’ याच विषयाशी निगडीत काम करायचं असं ठरवून, पुण्यात ब्रश अँड माऊस हा डिझाईनिंग स्टुडियो सुरु केला. कामाच्या निमित्ताने राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती भवरलाल जैन यासारख्या दिग्गज लोकांना भेटायचा योग आला आणि हसबनीस यांचे आयुष्य समृद्ध होत गेले. उस्ताद झाकीर हुसेन, लता मंगेशकर, सोनू निगम, उषा मंगेशकर, दिलीप प्रभावळकर अशा मात्तबर कलाकारांच्या कार्यक्रमांची डिझाईनिंगची कामे करण्याची त्यांना संधी मिळाली पण तरीही मन कुठेतरी अस्वस्थ होतं. आपल्या क्षेत्रासाठी मी काय करू शकतो, याचा हसबनीस यांनी २५ वर्षे पाठपुरावा केला. याचं समाधानकारक उत्तर मिळाल्यावर ते साध्य करण्यासाठी चार वर्षांच्या खडतर तपश्चर्येतून व प्रचंड आर्थिक नुकसान सहन करून सरतेशेवटी एक अद्भुत चित्रमालिका निर्माण झाली - ‘क्लोज्ड आईज अँड ओपन माईंड्स’ !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स जळगाव ' - सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.