डॉ. रविंद्र महाजन - उमेश सोनार
जळगावचे फुन्सुक वांगडू (मुलाखत)
डॉ. रविंद्र महाजन - उमेश सोनार
परदेशी वैद्यकीय उपकरणांच्या अफाट किंमती ही भारतीय डॉक्टरांची डोकेदुखी. अर्थात त्या खर्चाचा भार रुग्णांनाही सोसावा लागतोच. नेमकी ह्याच समस्येवर तोडगा शोधून काढला जळगावच्या उमेश सोनार ह्यांनी. कॉलेजमधून काढून टाकल्या गेलेल्या उमेश ह्यांनी आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर आणि त्यांचे गुरु डॉ. रविंद्र महाजन यांच्या पाठिंब्यामुळे महागड्या परदेशी वैद्यकीय उपकरणांची किफायतशीर भारतीय आवृत्ती तयार केली आणि ती गावोगावच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवली. आतातर ते ह्या स्वदेशी उपकरणांची इतर देशांत निर्यातही करतात. कसा होता उमेश यांचा हा प्रवास? जाणून घेऊया डॉ. रविंद्र महाजन आणि उमेश सोनार ह्या गुरुशिष्य द्वयीकडून.
डॉ. रविंद्र महाजन - उमेश सोनार यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे ‘पगारिया ऑटो’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स छत्रपती संभाजीनगर २०२२’ ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
अस्वीकृती (Disclaimer)
‘स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.