प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे
आर्थिक सुबत्तेचे GI मॉडेल (मुलाखत)
प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे
भौगोलिक मानांकन (Geographical Indication) ह्या सहजी आपल्या गणतीत न येणाऱ्या विषयात अभ्यासपूर्ण लक्ष घालून, निस्वार्थीपणे काम करणारे ॲड. प्रा. गणेश हिंगमिरे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रदेशात एकंदर ४८ GI मिळवून दिले आहेत; महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं ही त्यातलीच काही ठळक उदाहरणं. ह्यावर्षी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ नवे GI दाखल केले आहेत. GI म्हणजे नेमके काय? आणि त्याचा उपयोग आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी कसा केला जाऊ शकतो? हे समजून घेऊया खुद्द प्रा. गणेश हिंगमिरे यांच्याकडून.
प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे ‘पगारिया ऑटो’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स छत्रपती संभाजीनगर २०२२’ ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
अस्वीकृती (Disclaimer)
‘स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.