सुजाता रायकर
‘थॅलीसिमिया’ने माझे आयुष्य कसे बदलले?
सुजाता रायकर
सुजाता रायकर या मुळच्या सुजाता उप्पल. दिल्लीतील एका पंजाबी घरात जन्म झालेल्या सुजाताताईंचे शिक्षण गुजरातमध्ये झाले. २००८ साली, एका लहान मुलीच्या मदतीसाठी सुजाताताई हॉस्पिटलमध्ये गेल्या असता त्यांना ‘थॅलीसिमिया’ या एका आजाराविषयी माहिती कळली. ‘थॅलीसिमिया’ हा रक्ताचा दुर्धर आणि पूर्णपणे अनुवांशिक आजार. थॅलीसिमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा, औषधोपचार, रक्तचाचण्या, बोनस्कॅन यांची आवश्यकता असते – तीही आजन्म ! या कामाचा व्याप वाढू लागताच, सुजाताताईंनी ‘साथ चॅरीटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. आजच्या घडीला या ट्रस्टतर्फे अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सुमारे ऐंशी थॅलीसिमियाग्रस्त मुलांचा औषधोपचार व इतर मदतीची तहहयात जबाबदारी घेण्यात आली आहे.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video