Ticket Terms And Conditions - Welcome to Swayam Talks
×

TERMS AND CONDITIONS

सध्याच्या सुरक्षितता नियमावलीमुळे प्रत्येक व्यक्तीला आसन क्रमांक देणे आव्हानात्मक असल्यामुळे यावर्षी तुम्ही Premium, Executive वा Standard पैकी तुमच्या पसंतीच्या Category मधील हवी तेवढी तिकिटे बुक करू शकता. मात्र त्याचे आसन क्रमांक तुम्हाला कार्यक्रमाच्या चार दिवस आधी कळवण्यात येतील.

आपला आसन क्रमांक आपण सुचविलेल्या प्राधान्याने देण्याचा प्रयत्न असेल. प्रवेशिकांना आसन क्रमांक देण्याची प्रक्रिया ‘first booked first served’ पद्धतीने करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थिती बाबत लागू असलेल्या कोव्हीड नियमावलीप्रमाणे (५०% किंवा १००% उपस्थिती) प्रवेशिकांचे आसन क्रमांक ठरवण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.

आपल्याला मध्यंतरात भोजन हवे असल्यास आपण त्या भोजनाचे आगाऊ बुकिंग आत्ता करू शकता.

एकदा विकत घेतलेल्या तिकीटाचे वा भोजनाचे पैसे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. मात्र शासनाच्या नियमानुसार कार्यक्रम रद्द करावा लागला तर administrative cost वजा करून तिकिटाचे व भोजनाचे पैसे परत देण्याची सोय करण्यात येईल.

सध्याच्या कोव्हीड नियमावलीप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कोव्हीड नियमावलीचे पालन करूनच केले जाईल. त्यात आपल्याकडून काही दिरंगाई झाल्यास त्याबद्दलच्या कारवाईचे हक्क आयोजकांकडे असतील.

कार्यक्रम ठीक १०.३० वाजता सुरू होईल. आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी आपण आपल्याला नेमून दिलेल्या आसनावर कार्यक्रम सुरू व्हायच्या किमान पंधरा मिनिटे आधी येऊन आसनस्थ व्हावे ही विनंती.

कार्यक्रमाच्या दिवशी सभागृहात प्रवेशाचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे आणि त्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.

काही शंका असल्यास कृपया 9820118296 या क्रमांकावर संपर्क साधावा.