स्वयं चे 'AVस्मरणीय' क्षण ! - Welcome to Swayam Talks
×

स्वयं चे ‘AVस्मरणीय’ क्षण !

अजय गोखले

स्वयं टीमचे व्हिडीओग्राफर व संकलक अजय गोखले जागवतायत स्वयं संदर्भात केलेल्या काही शूटिंगच्या अजरामर आठवणी !!
 

Published : 1 June, 2020

स्वयं चे ‘AVस्मरणीय’ क्षण !

स्वयं टीमचे व्हिडीओग्राफर व संकलक अजय गोखले जागवतायत स्वयं संदर्भात केलेल्या काही शूटिंगच्या अजरामर आठवणी !!

२०१६ चे वर्ष कायम स्मरणात राहील ते स्वयंच्या AV making च्या नवीन concept साठी. सातत्याने नवीन काहीतरी करत राहिलं पाहिजे हा विचार काही स्वस्थ बसू देत नव्हताच. आणि एक दिवस नविनने declare केलं की आपण या वर्षी सर्व स्पिकर्सकडे जातोय त्यांचे कार्य शूट करायला आणि त्यांचे बाईट्स घ्यायला. या वर्षीच्या AV मध्ये कोणाचाही voice over नसणार आहे, कुठल्याही stock images चा वापर होणार नाहीये. त्यांच्याकडे हॊणाऱ्या शूटिंग मधून आणि त्यांच्या byets मधून आपल्याला AV बनवायची आहे. नविनने सर्व स्पीकर्सच्या कार्याची आणि त्यांच्या महानतेची साधारण outline दिली. बाकी तिकडे गेल्यावर जसं सुचेल तसं बघूया असं म्हणून पहिली मिटिंग संपली होती. एकंदरीत challanging च होतं. मंडळी, या सहाही जणांकडे जातांना घडलेला प्रवास, प्रवासातील गमतीजमती, त्यांच्याकडील वास्तव्याचे अमूल्य क्षण, शूटिंग दरम्यान घडलेले किस्से हे जर लिहायला बसलं तर एक पुस्तक होईल ! आज मी यातील माझ्या हृदयाजवळचा एक अत्यंत जवळचा अनुभव आपल्यापुढे मांडणार आहे. स्वयंटॉक्सचं जे ब्रीदवाक्य आहे " परिवर्तनाची सुरवात स्वतःपासून " याची अनुभूती यावी असा पहिला वक्ता - अर्थातच.. द ग्रेट यजुर्वेंद्र महाजन !

जळगाव स्टेशनवर आम्ही सकाळी ६ वाजता उतरलो. आम्हाला न्यायला गाडी आणि बरोबर दोन स्वयंसेवक हजर होते. मुंबई ते जळगाव प्रवासामध्ये नविनने यजुर्वेन्द्र, त्याचे कार्य, त्याच्या संस्था याची जुजबी माहिती दिली होती. आणि शेवटी " तिकडे गेल्यावर बघालंच तुम्ही, मी जास्त काही सांगत नाही " असं म्हणून संभाषण संपवलं होतं.
'अंध व दिव्यांग मुलांसाठी काम करणारा समाजसेवक' एवढंच त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं होतं.
आमची गाडी मनोबल संस्थेच्या गेटवर उभी राहिली आणि एखाद्या तीरासारखा यजुर्वेन्द्र आमचं स्वागत करायला धावत आला. मनोबलमध्ये पाऊल ठेवल्यावर जाणवलेली गोष्ट म्हणजे एक वेगळीच ऊर्जा त्या वास्तूत आहे. आणि या ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या यजुर्वेन्द्रने माहिती सांगायला सुरवात केली. या माणसामधे वक्तृत्व कला प्रचंड ठासून भरली आहे याचा प्रत्यय यायला लागला. त्याची expressions, त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास, त्याचा सळसळता उत्साह बघितल्यावर मला राहवेना. पटकन कॅमेरा काढला. असिस्टंटला लाईट्स लावायला सांगितले आणि शूटला सुरवात केली. काय शूट करायचे काहीच ठरलं नव्हतं. पण काही miss करायचं नाही आणि exclusive coverage करायचं एव्हढं पक्क केलं. आम्ही काय करायला आलो आहोत याचा यजुर्वेन्द्राला अंदाज होताच.
मग मनॊबलचा फेरफटका सुरु झाला. आणि एका वेगळ्याच जगाचं दर्शन घडायला सुरवात झाली. कुणाला डोळे नाहीत, तर कुणाला हात नाहीत, तर कुणाला पाय नाहीत… अशा या मुलांच्या रुम्समधून हिंडताना जाणवलेली गोष्ट म्हणजे आनंद, आत्मविश्वास, आत्मसम्मान हे केवळ त्यांच्या चेहेऱ्यावरच नव्हे तर त्या खोल्यांमधल्या भिंतीवर त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यांमधून ओसंडून वहात होते. हे सर्व शूट करत असताना हाताला कंप जाणवायला लागला. प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारी यंत्रणा पाहून थक्क व्हायला झालं. आणि मग मनोबल मधल्या एकएक रत्नांचं शूट करायला सुरवात झाली.
पांडुरंग… दोन्ही हात कोपऱ्याशी आणि दोन्ही पाय गुढग्याशी संपलेले, त्यांच्या टोकाशी असलेली चिमुकली बोटं. मी कॅमेरा on केला, ऍक्शन म्हणलं आणि सफाईदारपणे चालत येऊन टुणकन उडी मारून तो खुर्चीवर येऊन बसला. सराईतासारखी त्याची चिमुकली बोटं computer च्या keyboard वर चालू लागली. हातात पेन दिल्यावर दोन्ही हातांच्या बोटांमध्ये पकडून 'वळणदार अक्षर याला म्हणतात' याचं जणू पांडुरंगने demonstration च दिलं. त्याच्या बोटांचा close up घेताना अक्षरशः हात कापत होता. काय काय म्हणून शूट करू असं झालं होत. परमेश्वर सुद्धा कुणाच्या हातात काय जादू देईल खरंच सांगता येत नाही.

रीना… alternate एक हात आणि पाय नसलेली ती मुलगी, म्हणजे उजवा हात आहे तर उजवा पाय नाही. Action म्हणल्यावर चालत ( त्याला चालणं म्हणावं का रांगण अजून मला कळलेलं नाही ) येऊन खुर्चीवर बसली. तिची ती action शूट केल्यानंतर मला हातात कॅमेरा घेऊन शूट करणं अशक्य झालं. तिचा बाईट घ्यायचा होता. या मुलांना काही सांगायला लागायचंच नाही हो ! एखाद्या professional सारखं रिनाने बोलायला सुरवात केली. आणि " हो अगर हौसला बुलंद तेरा, तो हार कि क्या बात नहीं, हार जीत अपने हाथ नहीं होती, कोशिश तो तेरे साथ थी " या शेराने तिने end केला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडातून आलेलं "क्या बात है " आणि टाळ्यांचा कडकडाट हे सर्व रेकॉर्ड झालं. पुढे बरंच काहीबाही रेकॉर्ड होत राहिलं. कारण मी recording off करायला विसरलो होतो. दिग्मूढ होणे म्हणजे काय हे त्यादिवशी मला कळलं. आपण डोळे असूनही आंधळे असतो. काही अंध मुलांचं शूटिंग करत असताना "ए लाइट जरा मागे घे रे त्यांच्या डोळ्यांना त्रास होईल " असं assistant ला सांगितल्यावर पटकन जीभच चावली. एखादा अपमानित झाला असता. पण त्यांना त्याच काहीच वाटलं नाही. उलट गोड हसून म्हणाली "दादा आम्ही रेडी आहोत तुम्ही सुरु करा."प्रचंड भूक लागल्यावर समोर आलेली पंचपक्वान अधाशासारखी खावीत ना तसे कितीतरी क्षण माझा कॅमेरा अधाशासारखा टिपत होता. AV च्या end साठी काहीतरी exclusive shot हवा होता. एका वर्गामध्ये ४० ते ५० मुलं आणि त्यांच्यामध्ये यजुर्वेन्द्र असा शॉट घ्यायचा होता. काही डायलॉग होते. आणि end ची २ वाक्यं सगळ्यांनी म्हणायची होती. मी सर्वाना शॉट समजावून सांगितला. आणि "अनंत आमुची ध्येयशक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला" असा गजर सगळ्यांनी केला आणि शॉट one take final झाला.

मनोबल मधून पाय निघत नव्हता. पण दीपस्तंभच्या ऑफिस मध्ये यजुर्वेन्द्रचा महत्वाचा बाईट घ्यायचा होता. त्याच्या केबिनमध्ये मी शूटिंग ची arrangment केली. lighting सेट केलं. काय बोलायचं हे नविनने ब्रिफ केलं. एक रिहर्सल झाली. आणि फायनल take साठी मी action म्हटलं ! अचानक माझ्या headphones मध्ये दूरवर दांडिया खेळत असल्यासारखा आवाज यायला लागला. मी cut म्हणलं. आणि लक्षात आलं. रात्रीचे ९.३० वाजले होते. नवरात्रीचे दिवस होते. आणि दांडियाला जागोजागी सुरवात झाली होती. ती केबिन soundproof करण्यासाठी बरेच उद्योग केले. पण आवाज येतच होता. यजुर्वेन्द्रच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानं विचारलं "दादा, आवाज खूप disturb करतोय का?". मी म्हटलं "हो." मग तो सहज म्हणाला "ठीक आहे थांबवूया आवाज." मी, नविन आणि आशयने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. यजुर्वेन्द्रने एकाला हाक मारली आणि त्याला instructions देऊन पिटाळलं. मंडळी, आज देखील विश्वास बसत नाही, १५ मिनिटात आवाज थांबला होता. नविनने प्रवासात सांगितलेलं वाक्य आठवलं. "अरे तुला कल्पना नाहीये, हा माणूस काही करू शकतो." यजुर्वेन्द्रची बाईट संपायला १०.३० वाजले. आमचं pack up झालं. आणि झटकन आठवलं अजून हि आवाज थांबलेलाच आहे. पुन्हा यजुर्वेन्द्रने माणूस पाठवला आणि गरबा सुरु झाला. मी अक्षरशः त्याला कोपऱ्यापासून नमस्कार केला. आणि तेंव्हापासून आम्ही त्याला "डॉन" म्हणतो. (अर्थात चांगल्या अर्थाने.)

'दीपस्तंभ'च्या ऑफिसमध्ये pack up झाल्यावर भुकेची जाणीव झाली. रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते. आपल्याला हात पाय आहेत याची जाणीव व्हायला लागली होती. जेवायचं आमंत्रण यजुर्वेन्द्रच्या घरी होतं. कधी एकदा त्याच्या बिल्डिंगच्या लिफ्टने चवथ्या मजल्यावर जातोय आणि टेकतोय असं झालं होतं. आम्ही लिफ्ट मध्ये शिरलो आणि हा माणूस धडाधड पायऱ्या चढून वर आला. आम्ही त्याच्या घरी सोफ्यावर टेकतोय तोपर्यंत हा किचनमध्ये गेला. आमच्या आवडीची शेवभाजी स्वतः त्याने बनवून आम्हाला अक्षरशः भरवली. मनात म्हटलं, हा माणूस आहे का मशीन?दमणुकीनं आमचं पार माकड झालं होतं आणि सकाळी आम्हाला receive करताना ज्या उत्साहात तो होता त्याच उत्साहात तो रात्री होता.

स्वयं टॉक्सच्या रंगमंचावरच्या यजुर्वेन्द्रच्या 'भाषणाचा रियाज' आम्ही ऐकलाय आणि शूट केलाय. यजुर्वेन्द्रला २० मिनिटात तुझं भाषण संपव हे सांगणं म्हणजे सागराला २० मिनिटच लाटा किनाऱ्यावर पाठव सांगण्यासारखं आहे. तो कितीही तास अखंड बोलू शकतो. स्वयं मध्ये तो जे काही बोलला ते ऐकल्यावर डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. आणि रियाजामध्ये जे गायलं जातं त्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि अधिक सरस ! बैठकीत गायलं जातं त्याप्रमाणे यजुर्वेन्द्रने स्वयंटॉक्सच्या मंचावर जे भाषण केलं ते या पृथ्वीतलावरचं नव्हतंच. डॉ. निरगुडकरांबरोबर समस्त प्रेक्षागृहाला एका वेगळ्याच विश्वात तो घेऊन गेला. खरोखरचा दीपस्तंभ !

खरं सांगतो मंडळी, मनोबल आणि दीपस्तंभ मधले ते २ दिवस मी माझ्या हृदयातल्या 'cloud space' मध्ये कायमचे सेव्ह करून ठेवले आहेत. ज्यावेळी डिप्रेशन, दमणूक वगैरे वाटायला लागत ना तेव्हां हे २ दिवस डाउनलोड करतो. आणि मनोबल मधल्या मुलांच्या चेहेऱ्यावरचं ते हास्य, आत्मविश्वास पहिला की अक्षरशः recharge व्हायला होतं. यजुर्वेन्द्रच्या AV चे एडिट करत असताना कितीवेळा डोळ्यात पाणी आलं त्याला हिशोबच नाही. एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करायची आहे ती म्हणजे, कुठलीही AV परिणामकारक व्हायला दृश्यांबरोबर पार्श्वसंगीतही तेवढेच परिणामकारक असायला हवं हॊतं. आणि हे काम नविनने एका अशा माणसावर सोपवलं की जो एक उत्तम म्युझिक अरेंजर, संगीतकार, उत्तम कीबोर्डप्लेयर आणि खूप छान माणूस आहे. त्याचं नाव आनंद सहस्रबुद्धे. आनंदला मी rough cut व्हिडीओ पाठवला. आनंदने अतिशय उत्तम पार्श्वसंगीत दिलंय. यामुळे हा व्हिडिओ positively enhance झालाय. हा positiveness खूप महत्वाचा होता. या AV मधून कुठल्याही प्रकारचं कारुण्यportray व्हायला नको होतं. आणि तो परिणाम आनंदच्या या उत्तम पार्श्वसंगीतामुळे यशस्वी झाला. या व्हिडीओ मध्ये भूषण काळे नामक एका मूकबधिर मुलाचं मनोगत आहे. मुकी मुलं ज्या तऱ्हेनं हातवारे करून (जी त्यांची भाषा आहे) सांगतात तसा तो व्हिडीओ शूट केलाय. तो काय सांगतोय ते कळावं म्हणून तिथं आम्ही text टाकलंय. पण या ठिकाणी काय पार्श्वसंगीत हवं हे आम्हाला कळत नव्हतं. तिथं आनंद ने काहीच ठेवलं नाही. तो म्हणाला "silence" speaks everything. आणि हा silence इतका परिणामकारक ठरला की या ठिकाणी प्रेक्षागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अशा कितीतरी सुखद अनुभवातून तयार झालेली ही AV माझ्या खास आठवणींपैकी एक आहे. म्हणूनच ती AV आणि यजुर्वेन्दचे ते भाषण खालच्या लिंकवर खास तुमच्यासाठी देतोय.

मनोबल, दीपस्तंभ,यजुर्वेन्द्र यांच्या प्रवासाबद्दल बोलावं, लिहावं तेवढं कमीच आहे. म्हणून यावर एक short film करायचा विचार आहे. बघूया कसं जमतंय ते !

- अजय गोखले

लेखक हे कुशल व्हिडीयोग्राफर व संकलक असून स्वयं कार्यक्रमांच्या व्हिडीयोग्राफी व संकलनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...