स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग २) - Welcome to Swayam Talks
×

स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग २)

सचिन गायकवाड

नारायणगावमध्ये ‘स्वयं’ घेऊन जाण्यासाठी सचिन गायकवाड यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल आपण मागच्या भागात वाचलेत. आता या भागात सचिनजी सांगतायत  नारायणगावमध्ये झालेल्या  ‘स्वयं सेतू’च्या पहिल्या कार्यक्रमाबद्दल !      ‘स्वयं पुणे २०१९’ च्या कार्यक्रमाच्या काही दिवसानंतरच मला नविनजींचा फोन आला. खरं सांगायचं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी त्यांनी आमच्या चालू असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती घेतली […]
 

Published : 22 June, 2020

स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग २)

नारायणगावमध्ये 'स्वयं' घेऊन जाण्यासाठी सचिन गायकवाड यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल आपण मागच्या भागात वाचलेत. आता या भागात सचिनजी सांगतायत  नारायणगावमध्ये झालेल्या  'स्वयं सेतू'च्या पहिल्या कार्यक्रमाबद्दल !
      
'स्वयं पुणे २०१९' च्या कार्यक्रमाच्या काही दिवसानंतरच मला नविनजींचा फोन आला. खरं सांगायचं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी त्यांनी आमच्या चालू असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती घेतली आणि त्याबद्दल कौतुकही केले. त्याच संभाषणात त्यांनी आम्हाला 'स्वयं'च्या विलेपार्ले येथील ऑफिसमध्ये भेटण्यासाठीचे आमंत्रण दिले व ते मी खूप आनंदाने स्वीकारले.

दि. २५ जुलै रोजी मी व शिल्पा केवळ स्वयं टीमला भेटण्यासाठी मुंबईला आलो. 'स्वयं'च्या ऑफिसमध्ये नविनजी व आशय उपस्थित होते. 'स्वयं'चे ऑफिस असल्यामुळे सुरुवातीला मी आणि शिल्पा जरा अवघडूनच बसलो होतो. पण त्यांच्या प्रेमळ पाहुणचाराने व अनौपचारिक गप्पांमुळे आम्ही एकदम रिलॅक्स झालो. 'स्वयं'चे ते ऑफिस, त्याचे इंटिरियर, ते मोठे आयताकृती टेबल व त्यावर पडणारा तो मंद पिवळा प्रकाश आणि स्वतः नविनजी व आशय ! हे सर्व त्याक्षणी मला थोडं जादुई वाटलं. बराच वेळ चाललेला आमच्या गप्पांचा ओघ नंतर 'स्वयं सेतू'या एका नवीन कल्पनेकडे आला. अर्थात ही कल्पना नवीनजींनीच मांडली.त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आम्ही पूर्ण स्वयं टीमला नारायणगावला येण्याचे निमंत्रण दिले. केवळ एका महिन्याच्या आत म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी नविनजी, आशय,  दीपालीताई आणि श्रेया असे नारायणगावला आमच्या घरी हजर झाले ! 

मागील दीड वर्षांच्या प्रवासात 'टीम स्वयं'बरोबर आमची छान मैत्रीचं जमली होती. त्यामुळे आम्ही त्यांचा सर्व पाहुणचार व रात्रीचा मुक्काम आमच्या घरीच करण्याचे नियोजन केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नारायणगावच्या 'श्री अनंतराव कुलकर्णी English Medium School' या शाळेत पोहोचलो. शाळेचे अध्यक्ष डॉ.  आनंद कुलकर्णी व मुख्याध्यापिका सौ. अनघा जोशी मॅडम यांच्यासमोर नविनजींनी 'स्वयं सेतू' ही कल्पना उलगडून सांगितली. 'स्वयं सेतू' म्हणजे शाळेतील मुले व स्वयं talk यांना जोडणारा दुवा. यामध्ये शैक्षणिक वर्षातून किमान दोन वेळा मुलांसाठी स्वयं च्या माध्यमातून 'अवांतर शिक्षण' या स्वरूपाचा कार्यक्रम घेणे. त्यामध्ये स्वयं talk मधील वेगवेगळ्या वक्त्यांना शाळेत बोलावणे, त्यांचा मुलांशी संवाद घडविणे, त्यातून मुलांना शालेय पुस्तकांबाहेरील जग दाखविणे, मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, मुलांना काही अभिनव प्रोजेक्ट देणे, त्यात त्यांना मदत करणे असे सर्व होते. विशेष म्हणजे, यशस्वी विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून पालकांसाहित स्वयं talk चा मुंबई येथील कार्यक्रमाचे खास निमंत्रण होते. 

'स्वयं सेतू'ची कल्पना शाळेच्या management ला एकदम आवडली व त्यासाठी त्यांनी लगेचच green signal दिला.

 ठरल्याप्रमाणे 'स्वयं सेतू' चा पहिला कार्यक्रम २ डिसेंबर २०१९ रोजी झाला. गिधाड संवर्धक व वन्यजीव अभ्यासक श्री प्रेमसागर मेस्त्री यांनी आमच्या शाळेतील पाचशेहुन अधिक मुलांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात स्वतःच्या कामातील काही मजेदार तर काही अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगितले. या कामातील करियरच्या संधी व सरकारी योजना याविषयी संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी  मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरेही दिली. शेवटी ठरल्याप्रमाणे मुलांना 'नारायणगावमधील  वन्यजीव व पक्षी संवर्धन' या विषयीचा project देण्यात आला व 'best project'चे बक्षीसही घोषित करण्यात आले. 

अनेक मुलांनी या विषयावर projects तयार केले. आवश्यक त्या ठिकाणी श्री सागर मेस्त्री यांनी मुलांना mobile च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. मी स्वतः वेळोवेळी शाळेत जाऊन मुलांना follow up दिला. सर्व projects मेलच्या माध्यमातून स्वयं टीमला पाठविले व या अभियानाचा एक मध्यस्थ म्हणून काम पाहिले ! 

अखेर 'स्वयं मुंबई २०२०' साठी माझे संपूर्ण कुटुंब व सर्वोत्कृष्ठ प्रोजेक्ट विजेता विद्यार्थी असे पाचजण मुंबईत आलो. 'स्वयं प्रेक्षक ते स्वयं सेतू' या यशस्वी अभियानाबद्दल स्वयं टीमने त्या कार्यक्रमात आमचे खास कौतुक केले. डॉ उदय निरगुडकर यांच्या हस्ते आम्हा सर्वांचा सत्कार करण्यात आला.

 अशा प्रकारे 'स्वयं टॉक्स' ते 'स्वयं सेतू' या प्रवासाचे एक आवर्तन पार पडले.

सचिन गायकवाड (नारायणगाव)

लेखक हे स्वयं टॉक्स चे नियमित प्रेक्षक व शुभचिंतक आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...