स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग १) - Welcome to Swayam Talks
×

स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग १)

सचिन गायकवाड

सुरुवातीला स्वयं'चे प्रेक्षक म्हणून येणारे पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे सचिन गायकवाड यांनी 'स्वयं'ला ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा ध्यास घेतला, त्याची भन्नाट कहाणी ऐका खुद्द त्यांच्याच शब्दांत !
 

Published : 8 June, 2020

स्वयं टॉक्स ते स्वयं सेतू ! (भाग १)

सुरुवातीला स्वयं'चे प्रेक्षक म्हणून येणारे पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे सचिन गायकवाड यांनी 'स्वयं'ला ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा ध्यास घेतला, त्याची भन्नाट कहाणी ऐका खुद्द त्यांच्याच शब्दांत !  
चार ते पाच वर्षांपूर्वी सकाळ पेपरमध्ये 'अमृतयात्रा' या एका सामाजिक पर्यटनाविषयी माहिती वाचनामध्ये आली होती. काही कारणांमुळे त्या सहलींना जायचा योग आला नाही, मात्र या अभिनव उपक्रमाविषयी मला खूप कुतूहल वाटले. त्यामुळे त्या लेखाखाली असलेला नंबर मी टिपून ठेवला.

 २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात माझ्या मोबाईलवर स्वयं टॉक्स ची पहिली जाहिरात आली. आणि मग एकामागोमाग एक प्रोमो येत राहिले ! प्रत्येक प्रोमो पाहून मी अक्षरशः हुरळून गेलो. कारण त्यापूर्वी मी पुण्यात होणाऱ्या व्याख्यानमालांबाबत वाचले होते. परंतु त्या एखाद्या ठराविक विषयांवरच असत. शिवाय मी नारायणगावसारख्या ग्रामीण निम शहरी भागात राहत असल्यामुळे आमच्याकडे पूर्ण दिवसाच्या व्याख्यानमाला होत नाहीत व त्याकरिता पुण्याला जाण्याइतका मी फार व्यासंगीही नाही.
परंतु स्वयंची गोष्टच निराळी होती. 

एकतर ही कल्पनाच भन्नाट होती.
ती मांडण्याची पद्धत खूपच आधुनिक व प्रेरक होती. वक्त्यांची निवड, विषय, प्रोमो मध्ये दिलेला त्यांचा अल्प पण कुतूहल जागवणारा परिचय, रंगसंगती व सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यक्रमाचे ठिकाण 'वीर सावरकर भवन' ! हे सर्व म्हणजे मेजवानीच. सर्व काही आपल्या आवडीचे. त्यामुळे मी ऑफिसचे किंवा वैयक्तिक कुठल्याही कामाच्या अडचणीचा विचार न करता booking करून टाकले.  १४ जानेवारी २०१८ !

शिवाजी पार्कचे सावरकर सभागृह ! मी आणि शिल्पा सकाळी ९.३० वाजताच तिथे पोहोचलो ! खरंतर मी माझ्या आयुष्याच्या 39 वर्षात मुंबईत तिसऱ्यांदा आलो होतो. आयुष्यात पहिल्यांदा तिकीट काढून एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आलो होतो !

स्वागतास दिलेले ते तिळगुळाचे लाडू व तितक्याच गोडीचे सस्नेह स्वागत,आपुलकीने वागणारी टीम स्वयं, त्यांचा fresh व तितक्याच आल्हाददायक रंगातील युनिफॉर्म, हॉल मधील आरामदायक बैठक व्यवस्था,AC ची थंड झुळूक…हे सर्व आजही लक्षात आहे !

 विशेष म्हणजे कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झाला.

सारंग साठ्ये यांच्यापासून सुरू झालेली ती मैफल, रंगांची उधळण संध्याकाळी अधिक कदम यांच्या भारावून टाकणाऱ्या विलक्षण अनुभवांनी मंत्र मुग्ध करून संपली. शिवाय जोडीला डॉ उदय निरगुडकर म्हणजे कार्यक्रमाची शानच ! त्यांचा प्रत्येक वक्त्याशी होणारा सवांद म्हणजे अक्षरशः शब्दांची मुक्तहस्ते उधळण ! त्यांच्यामुळे आपल्या मराठी भाषेचा वजनदारपणा पुन्हा एकदा जाणवतो. प्रत्येक वक्ता अनुभवसंपन्न ! कुणीही एक दुसऱ्यासारखा नाही !  शिवाय संपूर्ण कार्यक्रम अगदी आखीव रेखीव असल्यामुळे व वेळेचे अगदी काटेकोर नियोजन असल्यामुळे खूप दर्जेदार व आगळे वेगळे विषय मनोरंजनात्मक स्वरूपात ऐकता आले. कार्यक्रमात एकरूप होणे किंवा 'pin drop silence' म्हणजे काय हे मी त्या दिवशी अनुभवले. कार्यक्रम संपल्यावर खुर्चीमधून उठताना मी शिल्पाला म्हणालो होतो की "आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात जे काही अविस्मरणीय व आनंदी प्रसंग असतील ना, तर त्यामध्ये आजचा स्वयंचा कार्यक्रम हा खूप वरच्या स्थानावर असेल.

" स्वयं मुंबई २०१८ नंतर स्वयं पुणे ,स्वयं औरंगाबाद पुन्हा स्वयं मुंबई २०१९,स्वयं पुणे, स्वयं औरंगाबाद आणि पुन्हा एकदा स्वयं मुंबई २०२० !  अशी आमची ही स्वयं वारी चालूच आहे व पुढेही चालूच राहील. या वारीमध्ये सुरवातीला मी आणि शिल्पा असे दोघेच होतो. त्यानंतर मात्र यामध्ये माझी मुलगी श्रावणी, बहीण सारिका आणि नीलम, मेहुणी जयश्री, तसेच माझा ऑफिस स्टाफ व काही मित्र मंडळी यांनाही सामील केले व त्यांना स्वयं टॉकच्या कार्यक्रमासाठी घेऊन आलो.आता स्वयं हे आमचे 'चार्जिंग स्टेशन'च बनलय. रोजच्या रुटीन आयुष्यामध्ये नकळत मनावरती एकप्रकारची नैराश्य, अनिश्चितता, तणाव, नकारात्मकता अशा अनेक गोष्टींची धूळ साठत असते. अशी ही धूळ वेळोवेळी साफ झाली तर मन प्रसन्न, तरतरीत व positive राहते.रोजच्या करावयाच्या कामात तर उत्साह वाटतोच पण नवनवीन कल्पनाही सुचतात.स्वयं चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बोलणारी माणसं 'आपल्यातली' वाटतात. त्यामुळे कुठलाही सामान्य माणूस कष्टाने किंवा एका ध्यासाने मोठ्या उंचीपर्यंत जाऊ शकतो हा आत्मविश्वास स्वयं मुळे मिळतो ! 

हे सर्व चालू असताना प्रत्येकवेळी मनात येई की स्वयंचे हे अभियान खूप लोकांपर्यंत ,विशेषतः शाळेतील मुलांपर्यंत पोहचले पाहिजे व त्यासाठी त्यांनी स्वयं कार्यक्रम पाहिला पाहिजे. परंतु वेळ, अंतर व पालकांचा शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त गोष्टीबद्दलचा दृष्टिकोन यामुळे ते मोठ्या प्रमाणात करणे शक्य नव्हते. या विषयी मी व शिल्पा बऱ्याच वेळा चर्चा करत होतो. शेवटी स्वयं औरंगाबाद २०१८ नंतर आम्हाला एक युक्ती सुचली.

"जर मुले स्वयं पर्यंत येऊ शकत नसतील तर आपणच स्वयं ला मुलांपर्यंत म्हणजेच शाळेपर्यंत घेऊन जाऊ" ! ही कल्पना आम्हा दोघांनाही मनापासून पटली व आम्ही त्यादृष्टीने कामाला लागलो.
सर्वात प्रथम आम्ही नारायणगाव पासून 15 किलोमीटर असणाऱ्या जुन्नर (शिवनेरी) येथील 'आदिवासी मुलींची आश्रमशाळा' या ठिकाणी 'डॉ राजेंद्र भारुड (भिल्ल समाजातील पहिले IAS) यांचा स्वयं मधील youtube वरील व्हिडीओ LED TV च्या माध्यमातून 250 मुलींना दाखविला. त्यावर मुलींशी चर्चा केली. डॉ. राजेंद्र भारुड यांच्या 'मी एक स्वप्न पाहिले 'या पुस्तकातील काही प्रसंग सांगितले. शेवटी मुलींची मनोगते ऐकली व कार्यक्रमाची सांगता झाली. या अनुभवामुळें आमचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर डॉ राजेंद्र भारुड यांच्याविषयीचा हाच कार्यक्रम आम्ही 'श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूल नारायणगाव' येथे केला. त्यासाठी आम्हाला शाळेचे अध्यक्ष डॉ आनंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ अनघा जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या ठिकाणी तर आम्हाला शाळेने नवीन प्रोजेक्टरच उपलब्ध करून दिला.
पुढे अशाच प्रकारचा कार्यक्रम आम्ही नारायणगाव मधील जिल्हा परिषदेच्या चारही शाळांमध्ये केला.
वरील कामाच्या अनुभवातून असे लक्षात आले की विद्यार्थी व शाळांसाठी हा कार्यक्रम खूपच उपयोगी ठरला.श्री यजुवेंद्र महाजन, श्री प्रदीप लोखंडे ,अनघा मोडक, श्री किरण पुरंदरे आणि श्वेता कुलकर्णी याचे स्वयं मधील व्हिडीओ मुलांना दाखविले, त्यावर चर्चा केली व मुलांची मनोगते ऐकली.या कार्यक्रमांसाठी साठी जिथे गरज असेल तिथे आम्ही घरचा LED TV व SPEAKERS घेऊन जातो. अश्याप्रकारे स्वयं मधून प्रेरणा घेऊन आम्ही हे छोटेसे काम सुरू केले व ते यथाशक्ती वाढविण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. 

हे सगळं ऐकून स्वयं टीमला तर आनंद झालाच..पण या टीमला फक्त यामध्ये समाधान मानायचे नव्हते.
'स्वयं' कार्यक्रमाचा तो 'जिवंत थरार' त्यांना नारायणरावमध्ये आणायचा होता. अर्थात हे माझेही स्वप्न होते. आश्चर्य म्हणजे, हे स्वप्न लवकरच पूर्ण झाले ! त्याविषयी वाचूचा पुढच्या भागात !!

 - सचिन गायकवाड (नारायणराव)

लेखक हे स्वयं टॉक्स चे नियमित प्रेक्षक व शुभचिंतक आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...