स्वयं, इकिगाय आणि मी.. - Welcome to Swayam Talks
×

स्वयं, इकिगाय आणि मी..

प्रसन्न पेठे

स्वयं''च्या संपूर्ण कामाला 'इकिगाय' या एका जपानी संकल्पनेचा आधार आहे, हे माहीत आहे का तुम्हाला ? त्याचविषयी सांगतोय, 'स्वयं' टीममधील प्रसन्न पेठे !
 

Published : 6 July, 2020

स्वयं, इकिगाय आणि मी..

'स्वयं''च्या संपूर्ण कामाला 'इकिगाय' या एका जपानी संकल्पनेचा आधार आहे, हे माहीत आहे का तुम्हाला ? त्याचविषयी सांगतोय, 'स्वयं' टीममधील प्रसन्न पेठे ! 


इकिगाय…! 
खूप वर्षांपूर्वी हा जॕपनीज शब्द कानांवरून गेला होता पण "स्वयं" परिवाराचा भाग होऊन, विलेपार्ल्याच्या आमच्या आॕफिसमधे प्रवेश केला मात्र - टेबलामागे भिंतीवर इकिगायच्या चार ओव्हरलॕपींग सर्कल्सचं पोस्टर दिसलं आणि "स्वयं"च्या निर्मितीमागची ती प्रेरणासुद्धा हे नविन आणि आशयकडून कळलं!'इकिगाय'चं इंग्लीश डिस्क्रिप्शन साधारण असं देतात - "things that you live for" किंवा "the reason for which you wake up in the morning"! जगण्याचं प्रयोजन हेच मुळी "आपल्या आवडीचं काहीतरी करत जगणं" असेल तर आयुष्य कायमच आनंदी, प्रसन्न आणि प्रचंड समाधानी नसलं तरच नवल नाही का? ;-) आणि मग अशी 'आवडीनुसार आयुष्य जगायला मिळालेली' समाधानी माणसं इतरांच्या तुलनेत जरा जास्तच वर्षं जगतात असंही डॕन ब्यूट्नरचं संशोधन सांगतं!'इकिगाय'वर अनेक पुस्तकं आहेत आणि अनेकांनी त्याच्या चार तत्वांवर लिहिलंय - Passion, Mission, Profession आणि Vocation!  थोडक्यात काय तर "आपल्याला ज्याचा जुनून आहे, जे मनापासून वाटतं तेच काम करायचं, आपल्याला  चांगलं जमतं तेच काम करायचं आणि ते करत असताना उपलब्ध संधींमध्ये आपल्या आवडतं तेच काम करत पैसा मिळवायचा" - इतकं जरी जमलं तरी मिळवली! खरं ते हे म्हणायला खुप सोप्पं पण करायला कठीण? … पण …जरा नीट विचार केला तर खरंच कठीण आहे का हे करायला? एखाद्याला संगीत आवडत असेल,  दुसऱ्याला चित्रकला, तिसऱ्याला फोटोग्राफी तर चौथ्याला लिखाण! मग त्या त्या आवडीच्या क्षेत्रांत करिअर न करता जगरहाटीनुसार इंजिनियरिंग,  मेडिकल, आयटी किंवा कॉमर्स अशी क्षेत्र निवडून त्यातच आयुष्य काढायचं का? आपली आवड मारून? ..की थोडं धाडस दाखवून 'आपली आवड' हेच आपलं कार्यक्षेत्र पैसे मिळवण्याचं ठरवायचं? (मध्यंतरी आलेल्या "थ्री इडियट्स"मध्ये काहीसा हाच संदेश होता नं की आवडीचं काम करावं वगैरे?…)डॕन ब्यूट्नरने केलेल्या संशोधनाप्रमाणे जगाच्या पाठीवरच्या पाच "ब्ल्यू झोन्स"मधली म्हणजे जपानच्या ओकिनावामधली, इटलीच्या सार्डिनियामधली, कॉस्टारिकाच्या निकॉयामधली, ग्रीसच्या इकेरीयामधली आणि कॅलिफोर्नियाच्या लॉमा लिंडामधली - या पाच प्रांतांमधली माणसं ही जगाच्या लोकसंख्येच्या सरासरी आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त वर्षं जगतात. आणि या पाचही ब्ल्यू झोन्समधली माणसं जे जगतात त्यांच्या जीवनशैलीचा लसावि काढला तर बहुतांशी तो 'इकिगाय'च्या तत्वांशी जुळतो! कमालच नैय का?!!तसाच विचार केला तर त्या पाच ब्ल्यू झोनवाल्या प्रांतातल्या माणसांची जीवनशैली आचरणात आणणं फार प्रचंड, कठीण नाहीचै आणि आपल्यासारख्या मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांनाही जमण्यासारखी आहे! ब्ल्यू झोनवाले कसं जगतात? तर - (१) राहणीमान सिम्पल ठेवायचं (२) आपल्या आवडीच्या कामासाठीच जगायचं (३) जगाच्या कटकटींचा विचार न करता आनंदी आणि समाधानी वृत्ती ठेवायची (४) बकाबका न खाता पोट ८०% भरेल इतकंच खायचं (५) कुठेतरी श्रद्धा ठेवायची (६) कळपांत राहायचं (७) मॉडरेट प्रमाणांत वाईन प्यायची (८) रोज थोडा व्यायाम करायचा (९) निसर्गाजवळ राहायचं आणि (१०) आलेला प्रत्येक क्षण जगायचा! "इकिगाय"सारख्याच आणखी तीन फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट्स पाठोपाठच वाचनात आल्या- "लाsगॉम, ह्युग्गा आणि उबुंटू !!! १) पहिली स्वीडिश लोकांची आवडती फिलॉसॉफी "लाsगॉम"!! म्हणजे काय तर "खूप कमी नाही, खूप जास्तीही नाही. तर अगदी पुरेसं. हवं तितकंच!" लाsगॉम फिलॉसॉफीचा भर हा व्यावसायिक काम (नोकरी/उद्योग) आणि पर्सनल काम यांच्यात सुंदर बॅलन्स राखणं हाच आहे. पुरेसं काम समाधानाने करा आणि मग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात आनंद मिळवा! स्वीडनमध्ये सर्वजण शार्प ५ वाजता ऑफिस सोडतात आणि घरी  जाऊन आपली आवडीची कामं करतात. (२) दुसरी नॉर्वेजियन आणि डॅनिश लोकांची "ह्युग्गा फिलॉसॉफी"! म्हंजे - समाधानी वृत्तीत, प्रसन्नतेत जगणं! आरामदायी, सुखकर क्षणांत जगणं! आपल्या आवडीच्या आणि आवडत्या माणसांच्या सान्निध्यात असणं आणि राहणं!!(३) तिसरी फिलॉसॉफी साऊथ आफ्रिकन लोकांची "उबुंटू" फिलॉसॉफी!! आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर -"एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ"! एकत्र येऊन, मिळून मिसळून काम करणं हे खूप महत्त्वाचं मानतात तिथे! 
 
थोडक्यात काय तर "इकिगाय, लाsगॉम, ह्युग्गा, उबुंटू" यातली कुठलीही फिलॉसॉफी असो - जास्तीची हाव न धरता, आनंदी, समाधानी आणि प्रसन्न वृत्तीनं आपल्याला, आपल्या आवडीच्या आणि आवडत्या माणसांत, आपल्या आवडीनुसार, आवडी जपत मनःपुत जगता आलं तरच - वोह जीना कोई जीना हैं लल्लू!!! आणि म्हणूनच कदाचित नियतीनं "स्वयं" ची दारं उघडी केल्येत माझ्यासाठी! म्हणूनच, तुम्हीही येनकेन प्रकारेण "स्वयं"शी जोडले जा आणि मग बघा, 'इकिगाय' तुमच्याही जीवनशैलीचा भाग होईल.

- प्रसन्न पेठे

लेखक हे 'स्वयं टाॅक्स'च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...