पडद्यामागचे स्वयं - Literally ! - Welcome to Swayam Talks
×

पडद्यामागचे स्वयं – Literally !

वीणा गोखले

स्वयं'ची कलादिग्दर्शक व फोटोग्राफर असलेल्या वीणा गोखले सांगतायत, स्वयं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पडद्यामागे नक्की काय घडतं !
 

Published : 15 June, 2020

पडद्यामागचे स्वयं – Literally !

'स्वयं'ची कलादिग्दर्शक व फोटोग्राफर असलेल्या वीणा गोखले सांगतायत, स्वयं कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पडद्यामागे नक्की काय घडतं !  

स्वयंच्या वेगवेगळ्या वक्त्यांमुळे आम्हाला कायमच प्रेरणा मिळत आहे हे तुम्ही गेल्या काही लेखांमध्ये वाचलंच आहे. आज मी विशेष करून लिहिणार आहे ते 'मुंबई स्वयं' सुरु होण्याच्या आधीच्या ३/४ तासांबद्दल.

आदल्यादिवशी पर्यंत जेवढी तयारी होणं अपेक्षित असतं ती तर झालेली असतेच पण आता पोटात गोळा असतो तो आयत्या वेळच्या challengesचा आणि technical smoothness चा. सर्वप्रथम सकाळी ६.३० पासून LED Wall ( २० फूट बाय १२ फूट ) वेळेत उभी रहाणे गरजेचे असते कारण ती उभी राहिल्याशिवाय सर्व placements व lighting होऊच शकत नाहीत. आमची सगळी टेक्निकल टीम आणि नविन-आशय असे प्रत्येक वर्षी कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी auditorium मध्ये जातो. LED wall ची placement, लाईट्सच्या जागा, साउंड या सगळ्यावर तासभर चर्चा होते. पण इतकं करूनही आयत्यावेळी अनेक तांत्रिक अडचणी येत राहतात. Online editing आणि कॅमेरा टीम सकाळी ८ ला हजर असतात. कॅमेरे place करून झाले की स्पीकर व डॉ. निरगुडकरांची placement फायनल करता येते. तो पर्यंत LED wall पूर्ण लागणं अपेक्षित असते. मग मी स्पीकरच्या जागेवर उभी राहून ओरडत असते ' अरे कुणीतरी centre कॅमेरावर जाऊन फ्रेम चेक करा.' फ्रंट कॅमेराने placement फायनल झाली तर side angle कॅमेराने काहीतरी प्रॉब्लेम येत असतो. सर्व अँगल्स नि placement फायनल झाल्या की सर्वात जोखमीचं काम म्हणजे 'lighting'. त्याची जबाबदारी जरी आमच्यावर असली तरी ऑडीटोरीयम चे लाईटदादा त्यांच्या जागेवर सापडत नसतात ! आणि असले तरी त्यांनी स्वतःचं डोकं चालवून काहीतरी भलतंच लायटिंग करून ठेवलेलं असतं ! लायटिंग सेट करणं हे अतिशय पेशन्सचं काम आहे. कारण त्याच्याशिवाय अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. 'अरे तो साईडचा लाईट कमी कर, स्पिकरचा 'गाल जळेल' (ही आमच्या फोटोग्राफीची भाषा ! म्हणजे एखादी फ्रेम over exposed होणे !) मग स्पीकर व निरगुडकर त्यांच्यावरच्या लायटिंग चा balance, LED WALL चा brightness आणि स्पिकरवरचा लाईट यांचा balance अशी कसरत चालू असते. एकीकडे AVs playing व स्पीकर्सचे presentation या करता लागणाऱ्या सेट अप साठी आशय झटत असतो. तर दुसरीकडे अजय आशयला सांगत असतात 'काही झालं तरी एक तरी technical trial झाल्याशिवाय पडदा बंद करायचा नाही.' मध्येच कुणीतरी येऊन सांगतो 'वीणाताई प्रत्येक बॅनरचा विथ क्राउड व विदाऊट क्राउड फोटो हवा आहे.' एकीकडे स्पिकर्स यायला लागलेले असतात. मध्येच स्नेहल सांगते 'काही झालं तरी सर्वांनी नाश्ता व चहा घ्या.' विंगेत यजुर्वेन्द्र प्रस्तावनेची रिहर्सल करत येरझाऱ्या घालत असतो. तेव्हां त्याला कुणीतरी हटकतं  'अरे तुला रिहर्सलची काय गरज आहे?' नविन आणि माझ्यामध्ये ३/४ वेळा तरी पुढील डायलॉग होतो. नविन : वीणाताई पडदा ? मी : 'नवीन प्लिज ५ मिनिटं.' लायटिंग फायनल व्हायचंय. (इथे नविन चा 'वी' दीर्घ झालाय याची नोंद घ्यावी !) 


LED चं सेटिंग, presentation च्या लॅपटॉप चं सेटिंग, सर्वांच्या placements, स्टेज लायटिंग, स्पीकर्सचे माईक हे सर्व सेट होईपर्यंत स्टेज तयार व्हायची वेळ आलेली असते. कार्यक्रमाची जी वेळ असते त्या वेळेच्या अर्धा तास आधी स्टेज तयार असलं पाहिजे असा 'स्वयं'चा नियम असतो.  त्याप्रमाणे कार्यक्रम अर्ध्या तासांवर येऊन ठेपलेला असतो आणि पडदा बंद होतो. मग साडेदहाच्या ठोक्याला 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात पडदा उघडतो. पडदा उघडून स्क्रीनवर पहिली AV सुरु झाली की बॅकस्टेजला सगळ्यांनी हुश्य केलेलं असतं. कारण पुढचं काम सर्व वक्ते व डॉ निरगुडकर चोख बजावणारच असतात.

 
अनेकांना प्रश्न पडतो की स्वयं कार्यक्रमाच्या आधी त्या बंद पडद्यामागे नक्की काय चालतं ! यातील तांत्रिक भाग थोडा सोपा करून सांगायचा प्रयत्न करते. त्यात काही इंग्लिश शब्द जास्त येतील त्याबद्दल क्षमस्व ! कुठल्याही visual चा जेंव्हा मनासारखा इम्पॅक्ट हवा असतो तेंव्हा लायटिंग हा अतिशय महत्वाचा भाग असतो. साधारणपणे ऑडिटोरियम मध्ये स्टेजसाठी जे 'स्टॅंडर्ड लायटिंग' असतं त्याला आम्ही टॉप लाईट म्हणतो. ज्याच्यामध्ये subject च्या डोळ्यात व डोळ्याखाली shadows मिळतात ज्याला आम्ही " डोळे जाणं " असं म्हणतो. त्यामुळे frontal लाईट ४५ डिग्री अँगल असणं आवश्यक आहे. आणि हे केल्यामुळे स्पीकरच्या डोळ्यात catch light मिळतो व तो सजीव होतो. दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे जेंव्हा बॅकग्राऊंड ला LED वॉल असते तेंव्हा subject चं लायटिंग खूप critically करावं लागतं. LED चा brightness जर subject पेक्षा ब्राईट असेल तर subject ब्लॅक होऊन बॅकग्राऊंड overpowering होऊ शकते. लाईव्ह ऑडियन्स चे डोळे त्याला adapt होऊन स्पिकरला व्यवस्थित बघू शकतात. पण कॅमेरा मात्र हे adaptation करू शकत नाही. त्यामुळे स्पिकरपेक्षा बॅकग्राऊंडला जास्त महत्व प्राप्त होतं. स्वयंचा लाईव्ह कार्यक्रम सभागृहात साधारण पाचशे ते सातशे माणसं पाहतात. पण स्वयंचे व्हिडीओज् social media वर अक्षरशः लाखो लोकं पाहतात. त्यामुळे सभागृहातील प्रेक्षक  व social media वरील प्रेक्षक या दोघांनाही त्याची समान अनुभूती मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. कुठल्याही ऑडिटोरियम मध्ये जाऊन जे available लायटिंग असतं त्यामध्ये शूट करणं आणि स्वतः लाइटिंग करून तो इव्हेंट शूट करणं यातील मानसिक समाधानात जमीन अस्मानाचा फरक आहे.  स्वयंचं काम करायला आवडण्याच्या असंख्य कारणांपैकी हेही एक कारण आहे. या सगळ्यासाठी मर्यादित वेळामध्ये आपल्या मनासारखं काम करण्याची मुभा आम्हाला मिळते.  त्याबद्दल स्वयं टीमचे आभार !प्रत्येकजण आपापल्या करियर मध्ये ज्ञानाने, अनुभवाने व कामाने पुढे जातंच असतो, त्यामध्ये यशस्वी होतो पण विचारांची समृद्धी व काम करण्याचं समाधान हवं असेल तर स्वयं सारखे कार्यक्रम आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. वर्षभर असंख्य लग्नसमारंभ, events, celebrity shoots चालू असताना 'स्वयं'चा दिवस मात्र आत्मिक समाधान व वर्षभर काम करण्याची ऊर्जा देऊन जातो ! 

- वीणा गोखले

लेखिका या सुप्रसिद्ध फोटोग्राफर असून स्वयं च्या सर्व कार्यक्रमांची फोटोग्राफी करतात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...