सावध ऐका पुढल्या हाका - Welcome to Swayam Talks
×

सावध ऐका पुढल्या हाका

पराग खोत

इंटरनेटवरच्या आभासी जगाची आपल्याला सवय झालीय. त्याच्याशिवाय जगणे जवळपास अशक्य आहे. मात्र मध्येच Whatsapp Privacy Policy सारखी एखादी बातमी येते आणि आणि आपण अस्वस्थ होतो. इंटरनेटच्या या महाप्रचंड विश्वात आपण नेमके कुठे आहोत आणि मनातली ही अस्वस्थता कमी करता येईल का? याबद्दल सांगतोय पराग खोत.
 

Published : 18 January, 2021

सावध ऐका पुढल्या हाका

इंटरनेटवरच्या आभासी जगाची आपल्याला सवय झालीय. त्याच्याशिवाय जगणे जवळपास अशक्य आहे. मात्र मध्येच Whatsapp Privacy Policy सारखी एखादी बातमी येते आणि आणि आपण अस्वस्थ होतो. इंटरनेटच्या या महाप्रचंड विश्वात आपण नेमके कुठे आहोत आणि मनातली ही अस्वस्थता कमी करता येईल का? याबद्दल सांगतोय पराग खोत.

व्हाॅटसअपने आपली Privacy Policy जाहीर केली आणि कोण गहजब झाला. आपल्या संबंधीची गोपनीय माहिती मार्क झुकरबर्गला कळणार म्हणून आपल्या पोटात गोळा आला. त्या माहितीचा गैरवापर करुन काय करता येईल याचा बागुलबुवा आपल्यासमोर उभा केला गेला. व्हाॅटसअप ऐवजी इतर social messaging ॲप्स वापरणे कसे सुरक्षित आहे याच्या पोस्ट्स धडाधड पडू लागल्या आणि गंमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व व्हाॅटसअपवरच सुरु होते. एखाद्याची वैगुण्ये त्याच्या तोंडून, त्यालाच ऐकवावीत असा तो प्रकार होता. पण या privacy breach ची सुरुवात कित्येक वर्षे आधीच झाली होती आणि व्हाॅटसअपने आपल्याला फक्त हे कळविले आहे इतकंच …

इंटरनेटच्या या अद्भुत दुनियेत कसलाही विधिनिषेध पाळला जात नाही. एखादे ॲप डाऊनलोड करताना किंवा पोर्टल वापरताना आपल्याला त्यांच्या Terms and Conditions चे एक पान दिसते. आपण त्या वाचतो का? मी तरी अजूनपर्यंत वाचलेल्या नाहीत. Accept चे बटण दाबून ते मोफत ॲप वापरायची आपल्याला घाई झालेली असते. त्या कधीही न वाचल्या गेलेल्या Terms Agreement मध्ये आपल्या कडून आपली सगळी माहिती ‘वापरण्याची’ परवानगी घेतली गेलेली असते. Web world मध्ये कुठलंही Product जेव्हा आपण फुकट वापरत असतो, तेव्हा तिथे आपणच एक Product असतो हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या आवडीनिवडी, नेहमी जाण्याच्या जागा, आपले मित्रमैत्रिणी, आपण विकत घेण्याच्या विचारात असलेल्या वस्तू किंवा सेवा इथपासून ते आपली कौटुंबिक माहिती, बॅंक आणि क्रेडिट कार्डाची माहिती इत्यादि सर्व गोष्टी एका Database मध्ये व्यवस्थित साठवून ठेवल्या आहेत. मी आता जेव्हा एखादी गोष्ट Online खरेदी करतो तेव्हा तो Payment Gateway मला माझा बॅंक अकाउंट किंवा क्रेडिट कार्डाचा नंबर आणि इतर माहिती दाखवून Payment कसे करायचे ते विचारतो. मला फक्त माझ्या Mobile वर आलेला OTP टाकून ती खरेदी पूर्ण करायची असते. याचाच अर्थ मी आधी दिलेली माझी सगळी गोपनीय माहिती त्यांना यथास्थित store करुन ठेवली आहे आणि त्याचा वापर ते माझ्या कळत नकळत करु शकतात.

डाॅ. महेश खर्डे नावाचे माझे एक मित्र आहेत. व्यवसायाने अस्थिव्यंग विशारद असले तरी Cyber Security या विषयावर त्यांचा अभ्यास दांडगा आहे. आपल्या प्रत्येक Log in साठी सुरक्षित आणि नवीन Password कसा तयार करायचा आणि तो कसा लक्षात ठेवायचा यासाठी त्यांनी एक अभिनव पद्धत शोधून काढली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार आपण आपले जे Password ठरवतो ते आपल्याला great वगैरे वाटत असले तरीही निष्णात हॅकर्स ते थोड्याश्या प्रयत्नाने सहज शोधून काढू शकतात. ते म्हणतात, “तुमचा मेल किंवा बॅंक अकाऊंट hack होत नाहीये याचे एकमेव कारण म्हणजे तुमच्या mail account मध्ये अत्यंत गोपनीय माहिती आणि bank account मध्ये भरपूर पैसे नाहीयेत म्हणून. अन्यथा ते hack करणे फारसे कठीण नाही.”

जग झपाट्याने विस्तारतंय. तंत्रज्ञान वेगाने विकसित होतंय आणि Data चा महाप्रचंड स्फोट झालाय. जगाची या पुढची economy ही हा Data असणार आहे. या पुढचं महायुद्ध हे Data साठी होईल आणि ते रणांगणावर नाही तर इंटरनेटवर खेळलं जाईल. जगभरातल्या इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा Data हा सुविहीत पद्धतीने कुठे ना कुठे साठवला जातोय आणि त्याचा योग्य - अयोग्य वापर होतोय. Artificial Intelligence च्या शोधामुळे हे सगळं अजूनच सोपं झालंय. क्वचित कधीतरी फेसबुक किंवा गुगलने Data विकला किंवा share केला अशा बातम्या येतात आणि आपली अस्वस्थता वाढते. पण हे काम अव्याहतपणे सुरु असते. आपल्या सगळ्यांचीच ही सगळी माहिती Dark Web नावाच्या काळ्या दुनियेत विक्रीला ठेवलेली असते. अनंतहस्ते कमलावराने, Data घेशिल किती दो कराने अशी अवस्था झाली आहे.

त्यामुळे व्हाॅटसअपने जाहीर केलेल्या (आणि नंतर मानभावीपणे मागे घेतलेल्या) Privacy Policy मुळे बिचकून जाण्याचे कारण नाही. आपली या आधीची सगळी माहिती त्यांच्याकडे आहेच. आपल्याला फक्त या पुढची काळजी घेता येईल. अजिबात इंटरनेट न वापरणे हा सर्वोत्तम उपाय असेल. पण ते अशक्य आहे. म्हणून आपली वैयक्तिक माहिती जितकी कमी share करता येईल तितके चांगले. पण यातही एक गोम आहेच. जरी आपण ही माहिती share केली नाहीत आणि आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवाराने केली तरी परिणाम तोच असेल. एखाद्याचा फोन hack झाला आणि आपण त्याच्या contact list मध्ये असू तर आपला फोन क्रमांक हा त्या Data मध्ये जाणारच आहे.

तेव्हा या सर्व गोष्टींचा जास्त विचार न करता, Cyber Experts नी वेळोवेळी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम पाळून आपलं आभासी आयुष्य सुरु ठेवूया. आपलं खाजगी आयुष्य जपूया. प्रत्येक वैयक्तिक गोष्ट Facebook किंवा Instagram वर टाकलीच पाहिजे असा अट्टहास नको. प्रत्यक्ष भेटीगाठी किंवा फोनवर बोलून आपल्या सुह्रदांच्या संपर्कात राहू, जेणेकरुन आपल्याला या आभासी दुनियेची जास्त गरज भासणार नाही.

सध्या social media वर फिरत असलेला एक विनोद सांगतो. व्हाॅटसअप असुरक्षित आहे म्हणून Telegram किंवा Signal ही नवी ॲप्स वापरण्याची जोरदार शिफारस केली जातेय. Telegram कसं encrypted आहे किंवा Signal कसं open source code आहे वगैरे गुण गायिले जाताहेत. आपण जर सगळे व्हाॅटसअप सोडून हे नवं Telegram किंवा Signal वापरायला लागलो आणि उद्या मार्क झुकरबर्गने ही दोन्ही ॲप्स विकत घेतली तर ….

असो. तस्मात् मनात कुठलीही अनावश्यक भीती न बाळगता, योग्य ती काळजी घेऊन आपण आपलं आभासी आयुष्य सुरु ठेवूया. मात्र त्याचवेळी योग्य तो विधिनिषेध बाळगून सावधपणे पुढील हाका ऐकूया.

पराग खोत

लेखक हे स्वयं च्या Content Team चे सदस्य आहेत.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...