प्रोजेक्ट स्वदेश ! Inspiring Ideas for Aspiring Bharat - Welcome to Swayam Talks
×

प्रोजेक्ट स्वदेश ! Inspiring Ideas for Aspiring Bharat

नविन काळे

इंग्लिश -हिंदी सारख्या तुलनेने अधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा बोलता येत नाहीत, या एका दुय्यम मुद्द्यावर देशातील एकही चांगली idea वा innovation वाया जाऊ नये यासाठी स्वयं घेऊन येतंय - प्रोजेक्ट स्वदेश ! या देशाचे चित्र बदलण्याची ताकद असलेल्या या अनोख्या प्रोजेक्ट बद्दल सांगतोय, नविन काळे.
 

Published : 3 August, 2020

प्रोजेक्ट स्वदेश !  Inspiring Ideas for Aspiring Bharat

इंग्लिश -हिंदी सारख्या तुलनेने अधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा बोलता येत नाहीत, या एका दुय्यम मुद्द्यावर देशातील एकही चांगली idea वा innovation वाया जाऊ नये यासाठी स्वयं घेऊन येतंय - प्रोजेक्ट स्वदेश ! या देशाचे चित्र बदलण्याची ताकद असलेल्या या अनोख्या प्रोजेक्ट बद्दल सांगतोय, नविन काळे.


'स्वयं' मला North East मध्ये पोहोचवायचंय !'
आमच्या परांजपे काकांच्या या एका वाक्याने माझे कान टवकारले ! नुसत्या विचारानेच माझी झोप उडाली !! या देशात आपण अजून किती काम करू शकतोय या शक्यतेच्या जाणीवेने !मी भानावर येत परांजपे काकांना म्हटलं, अप्रतिम कल्पना आहे. पण आपण सुरुवात हिंदी पासून करूया. स्वयंचे वक्ते हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले तर धमाल येईल ! काकांनीही दुजोरा दिला. केवळ वयाच्या आकड्यामुळे काकांना 'सिनियर सिटीझन' म्हणायचं. काका शिक्षणाने व व्यवसायाने Chartered Accountant असले तरी आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे ईशान्य भारताच्या कल्याणासाठी झोकून दिलेली आहेत. आपल्या उदयजींनी (डॉ निरगुडकर) काकांना 'स्वयं'शी जोडून दिलंय. त्या दिवसापासून (आणि अगदी लॉकडाउनच्या काळातही एका कॉलेजकुमारच्या उत्साहात परांजपे काका माझ्या सतत संपर्कात राहिले. इतकंच नाही, तर मेघालायतील एका उत्साही शिक्षकाला आमच्याशी जोडून दिलं ! एका फार मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी होत्ये याचा आता अंदाज यायला लागला !'स्वयं' जर अधिक प्रभावी पध्दतीने पोहोचवायचे असेल तर केवळ substitles टाकून चालणार नाहीत तर ते मराठीमधील Talks हिंदी भाषेत 'डब' करावे लागणार होते. 'डबिंग' हा अतिशय किचकट व खर्चिक प्रकार आहे. कारण 'डबिंग' करणारे कलाकार व तंत्रज्ञ अत्यंत अनुभवी आणि व्यावसायिक असावे लागतात. आम्हाला या कामात दर्जाच्या बाबतीत कुठलीच तडजोड करायची नव्हती. करायचं तर उत्कृष्ट, नाहीतर  करायचं नाही, हे स्वयं चं सुत्रच राहिलेलं आहे. सुदैवाने डबिंग क्षेत्रात अनेक वर्षे काम केलेले प्रसाद फणसे यांनी स्वयंच्या या प्रोजेक्टची ताकद ओळखून तात्काळ जबाबदारी स्वीकारली. उन्मेष गद्रे सरांनी काही मोजक्या talks चं भाषांतर करून दिलं.डबिंगचा एक प्रयोग करून पाहूया म्हटलं तरी त्या प्रयोगाची एक भारी किंमत होती. मी स्वप्नात कितीही तीर मारले तरी वास्तवातील भाता मात्र रिकामा होता. पण धाडसी निर्णय घेण्यात कायमच आग्रही असणाऱ्या आशयने माझ्या मागे लागून डबिंगची तारीख जुळवून आणली.डबिंगची तारीख ठरली. सध्या नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर असलेले डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अतिशय प्रेरणादायी Swayam Talk ने या प्रोजेक्टचा मुहूर्त करायचा असे ठरले.

आमचे भाग्य थोर की त्यांना 'हिंदी' आवाज  देण्यासाठी डबिंगच्या दुनियेतील आजचा नामवंत 'आवाज' संकेत म्हात्रे हा तरुण व प्रतिभावंत कलाकार येणार होता. Discovery, Nat Geo, Netflix, Animation Films आणि साऊथमधून हिंदीत 'डब' होणारे चित्रपट यात संकेतचा आवाज असतो. डबिंग करताना तुम्हाला त्या मूळ आवाजाचा लेहजा, लकब, व्यक्तिमत्त्व, विषय या सगळ्याचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो. संकेत आणि प्रसादची अत्यंत अभ्यासू, कष्टप्रद व कौशल्यपूर्ण कार्यपद्धती खूप जवळून अनुभवता आली. स्वयंच्या या भव्य प्रोजेक्टसाठी छान टीम मिळाली याचा आनंद झाला. आणि अखेरीस चार तासांच्या अविश्रांत मेहनतीनंतर स्वयं हिंदीचा पहिला 'पायलट एपिसोड' तयार झाला !स्वयं टीमच्या आदिश आणि चिन्मयीने या संपूर्ण डबिंग प्रोसेसचे लाईव्ह चित्रीकरण करून त्याची एक छान क्लिप तयार केलीय. या लेखासोबत असलेली ती क्लिप तुम्ही जरूर पहा, म्हणजे एक गोष्ट डब करायची असेल तर त्यासाठी किती कष्ट लागतात याचा अंदाज येईल.त्यादिवशी त्या डब केलेल्या भाषणाचा एक तुकडा मी माझ्या सिंगापूरमधल्या वर्गमित्रासोबत शेअर केला. मित्र म्हणाला, स्वयंच्या या पहिल्या हिंदी एपिसोडची जबाबदारी मला घ्यायला आवडेल ! गेली अनेक वर्षे सिंगापूरमध्ये राहून सुद्धा भारताशी, मराठी भाषेशी नाळ तुटू न दिलेल्या या मित्राच्या उत्तरावर मी अक्षरशः निःशब्द झालो…आणि पुढच्या क्षणी मेंदूत शब्द उमटले…प्रोजेक्ट स्वदेश !


या देशातील अफलातून प्रेरणादायी कहाण्या या देशाच्या तरुण पिढीपर्यंत 'त्यांच्या मातृभाषेत' पोहोचवायच्या ! या संकल्पनेतील सामर्थ्य जाणणाऱ्या कोणाही सच्च्या भारतीयाने (मग तो या देशात राहत असेल वा परदेशात !) या प्रोजेक्टमधील एका प्रेरणादायी भागाचे प्रायोजकत्व स्वीकारावे !
Inspiring Ideas for Aspiring Bharat - Powered by True Bharatiya !तुम्ही म्हणाल, इंग्लिश भाषेचं वर्चस्व वाढत असताना मातृभाषेतला content कोण ऐकणार आहे? मंडळी, तुमच्या माहितीसाठी एक गंमत सांगतो. Google-KPMG च्या एका रिपोर्टनुसार - thanks to cheap internet and extensive mobile penetration, 2021 नंतर आपल्या मातृभाषेतील डिजिटल conent ला कमालीचं महत्व येणार आहे. जे इंग्लिशलाही मागे टाकणार आहे. त्यात नंबर एक वर हिंदी भाषा असणार आहे, आणि क्रमांक दोन वर आपली मराठी !! Grassroot Innovators ना प्रोजेक्ट स्वदेश मुळे त्यांच्या ideas मांडण्यासाठी इंग्लिश बोलता येत नाही हा अडसर यापुढे असणार नाहीये ! इंग्लिश - हिंदी सारख्या 'सर्वमान्य प्रमाण' भाषा बोलता येत नाहीत म्हणून या देशातील एकही चांगली idea वा innovation वाया जाऊ नये हा या प्रोजेक्टचा मूळ गाभा आहे.प्रोजेक्ट स्वदेश च्या अथांग शक्यतांचा विचार करून माझी खरंच झोप उडाल्ये ! माझ्या डोळ्यात मावत नसलेला एक भव्य स्क्रीन आता माझ्यासमोर उभा  आहे…मराठी वक्ते हिंदीत, तामिळमध्ये, काश्मीरीत, बंगालीत, गुजरातीत बोलताना दिसतायत आणि एखादा आसामी तरुण शास्त्रज्ञ, तेलगू शेतकरी, पंजाबी व्यापारी मराठीत ऐकू येतायत ! या देशातल्या विविध प्रांतातील अव्वल ideas innovations प्रत्येकाला स्वतःच्या मातृभाषेत ऐकता पाहता येतायत !! संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा हा अपूर्व संगम भारताच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचा अभिमान जागृत करेल.'स्वयं'च्या 'प्रोजेक्ट स्वदेश'मध्ये आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सामील व्हावे हे आवाहन मी अत्यंत आत्मविश्वासाने करत आहे. सरकारी यंत्रणा, कॉर्पोरेट संस्था यांचे महत्व जराही कमी न लेखता मला नम्रपणे वाटते की देशाचे मोठेपण टिकते किंवा ढासळते ते त्या देशातील सामान्य नागरिकांच्या शक्तीवर. प्रोजेक्ट स्वदेशच्या माध्यमातून या देशातल्या भन्नाट कल्पनांची देवाणघेवाण मातृभाषेतुन करण्यासाठी स्वयं पुढाकार घेतंय. स्वयं च्या पाठीशी (याही वेळी) भक्कमपणे उभं राहण्याची संधी आपण गमावणार नाही, याची खात्री आहे !

- नविन काळे

(आपण कुठल्याही पद्धतीने प्रोजेक्ट स्वदेश मध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर कृपया आपल्या नावसाहित Project Swadesh हा मेसेज +91982051917 या क्रमांकावर पाठवावा. स्वयं टीम आपल्याशी संपर्क साधेल.)

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त...