Memes : Creativity चा नवा चौकोन - Welcome to Swayam Talks
×

Memes : Creativity चा नवा चौकोन

वैष्णवी कानिटकर

रोजच्या जगण्यातली विसंगती शोधून त्यावर तिरकसपणे केलेले भाष्य ही खरंतर एक कला आहे. सूक्ष्म निरीक्षण आणि उत्तम विनोदबुद्धी यांच्या योग्य मिलाफातून निर्माण होणाऱ्या Memes बद्दल सांगतेय वैष्णवी कानिटकर
 

Published : 1 March, 2021

Memes : Creativity चा नवा चौकोन

 एका मांजराच्या फोटोपासून ते बिनोद नावाच्या माणसापर्यंत, कोण कुठे घाटात Powri (Party ) करतंय इथपासून ते श्वेताला mic बंद कर म्हणून सांगण्यापर्यंत! हे सगळे विषय जवळचे आणि कुठेतरी वाचल्यासारखे वाटतायंत का?  तसे बघायला गेले तर अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या वाटणाऱ्या या घटना आपण अगदी रोजच्या आयुष्यात बघत असतो, अनुभवत असतो. पण ज्या वेळी काही सुपीक डोक्यातून कल्पना येतात आणि ती रोजच्या आयुष्यात घडणारी साधी सरळ आणि सोपी घटना एक trend बनून जाते.
सध्या internet वर धुमाकूळ घालणारी गोष्ट म्हणजे memes. एका चौकोनात किती गोष्टी बसवता येतात हे यामुळे कळते. कोणी कुठे रिकामा कुकर गॅसवर चढवला तर कोण ultra legend आहे, कोणाच्या कुत्र्याला tommy म्हणायचे आणि कोणाला नाही या सगळ्यावर विचार करता करता आणि गप्पा मारताना आपणही त्या process चा अविभाज्य भाग बनून जातो.  

 Memes म्हणजे नक्की काय, तर Google ने सांगितल्याप्रमाणे "an image, video, piece of text, etc., typically humorous in nature, that is copied and spread rapidly by internet users, often with slight variations."

रोजच्या जीवनात घडणारी घटना, सुपीक डोके आणि सोबतीला internet या त्रिकुटामुळे अतिशय उच्च दर्जाचे memes बनतात. ते बघताना आपणही हळूच हसतो, काही आपल्यालाही relate होतात. काहींना त्या memes मधली आई आपल्या घरातलीच वाटते तर काहींना उगाच त्रास देणारा single bestfriend त्या memes बघितल्यावर आठवतो.

खरंतर या memes वर काम करणं ही सोपी गोष्ट नाही. एका चौकोनात आपली creativity वापरून, त्यातून दुसरेच काहीतरी बाहेर काढून, त्याचा तिसराच अर्थ लावून, चौथ्याच लोकांना ती आपलीशी वाटायला हवी हा खरंच skills चा मुद्दा आहे. बऱ्याचदा असेही होते की काही ठराविक वयाच्या लोकांना असे वेडे चाळे केलेले आवडत नाहीत. पण जेव्हा काही आजी त्यांच्या भिशीच्या group मध्ये ह्या memes वर चर्चा करतात त्यावेळी internet मुळे खरंच माणसे जवळ आली आहेत आणि सगळ्यांना एकमेकांच्या भाषा कळायला लागल्या आहेत यावर विश्वास बसतो.  आपल्याला रोज दिसणारी घटना इतकी humourous होऊ शकते आणि आणि प्रत्येक गोष्टीकडे बघायचा सगळ्यांचा दृष्टिकोण किती वेगळा असू शकतो याची जाणीव होते. अगदी रोज घरात किंवा कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या घटना, सहकाऱ्यांचे वागणे, प्रवासातील गंमतीजमती, राजकारणातील विनोद, लोकांच्या विचित्र सवयी, नवनवीन trends हे सगळे विषय यामध्ये समाविष्ट असतात. हल्ली सगळ्यांचा ''attention span" खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात आपल्यापर्यंत आवश्यक तो content आणि त्यातला नेमका अर्थ पोहोचवायचे काम memes खूप उत्तम प्रकारे करतात.

आपल्या हलक्याफुलक्या भावना कोणापर्यंत पोहोचवायच्या असतील, कोणाला हळूच एक कोपरखळी मारायची असेल किंवा हसतखेळत काहीही सांगायचे असेल तर memes हे एक efficient medium आहे आणि नव्या पिढीतील जवळपास सगळेच याचा भक्कम आधार घेतात.

पण हे माध्यम वापरताना जरा जपूनच हं! या memes मुळे आपण कोणाचे मन तर दुखावत नाही ना? हेही लक्षात घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण 'meme (मिम)' या ‘मिश्किल मजेची' कधी 'kashi (काशी)' म्हणजे 'कायमची शिक्षा' होईल हे सांगता यायचे नाही.  

- वैष्णवी कानिटकर
लेखिका ही 'स्वयं टाॅक्स' च्या content team ची सदस्य आहे.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...