'स्वयं पुणे' टीममधील मंगेश वाघ सांगतोय त्याचं स्वयं विषयीचं मनोगत…
काही मशीन्स असतात, output ठीकठाक देतात. पण त्यांचं काम चालू असताना नकोसे वाटणारे आवाज येतात कर्र, कच्च्, खाट्, खुट्… फार वेळ तसल्या मशीनच्या बाजूला थांबणं शक्य होत नाही आपल्याला. आणि काही मशीन्स अशी असतात की मस्त, शांततेत effectively आणि efficiently काम करतात. बोली भाषेत 'मख्खन' म्हणतो आपण. इंग्रजी मध्ये एक शब्द प्रयोग आहे, well-oiled machine. स्वयंचा प्रत्येक कार्यक्रम ना, हा असा असतो, well-oiled machine. श्रोते, व्यक्ते, स्वयंसेवक, सगळ्यांसाठी.
नविनची मूळ कल्पना, हेतू फारच छान आहे. त्याला काका आणि स्नेहलने केलेला active support ही महत्त्वाचा. त्यानंतर मित्र परिवार, स्वेच्छेने जोडली गेलेली माणसं, एकूणच रुंदावत गेलेल्या कक्षा… ह्यासाठी कारणीभूत आहे ती स्वयंची value system.
स्वयं मुळे आणि मध्ये अनेक छान गोष्टी अनुभवायला मिळाल्या. त्यातल्या operational model बद्दल मला विशेष सांगावसं वाटतं.जेंव्हा हेतू चांगला असतो, अनेक गोष्टी आपोआप घडतात. पण सगळ्याच गोष्टी आपोआप नसतात. आणि तशी अपेक्षा म्हणजे अंधश्रध्दा. हे असं well-oiled machine वाटण्यामागे चांगल्यापैकी brainstorming, action, continuous improvement, त्यातील जिद्द आणि सातत्य आहे. स्वयं टीमने operational excellence ची कास धरली आहे आणि आम्ही त्यासाठी 100% committed आहोत. एक स्वयंसेवक ह्या नात्याने हे सांगायला मनापासून आनंद होतो.वक्त्यांकडून श्रोत्यांना मिळणारी प्रेरणा हा महत्वाचा भाग आहेच. त्याबरोबर त्यांचा overall experience खूप छान व्हावा ह्यासाठी कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करायची नाही, ही स्वयं टीमची प्रेरणा आहे. कितीही छोटं, तुलनेनं कमी महत्त्वाचं काम असेल तरी.
अर्थातच पहिल्या, किंबहुना सुरुवातीच्या काही कार्यक्रमांमध्ये त्रुटी होत्या. अनुभवाने त्यावर मात होत गेली. काही बाबींचा सखोल विचार करणं गरजेचं होतं. तो केला गेला. श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा विचार होत गेला. त्यावर अभ्यास केला गेला. ह्यात सातत्य होतं, त्यामुळे एक चांगलं operational model उभं राहिलं. चांगली संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी, टिकण्यासाठी आणि बहरण्यासाठी त्याचं repeatable model तयार होणं आवश्यक असतं. ते होत गेलं. सर्व मोठ्या आणि छोट्या बाबींसाठी कडक्क standard operating procedures बनत गेल्या. त्यात सातत्याने सुधारणा केली गेली.
आणि पुढेही हे होत राहण्यासाठी आवश्यक असं पोषक वातावरण टीम मध्ये आहे.विषय निवडणे, वक्ते शोधणे, शिल्पा आणि भाग्यश्रीची वक्त्यांबरोबर काम करायची पद्धत, अजयदादा आणि वीणाताईचं stage setup, videography, photography, दीपालीचं administration, स्नेहलचं organization आणि सर्व माणसांची काळजी घेणं…. ही सगळी अपने-आपमें मस्त operational models आहेत. सर्व स्वयंसेवक ह्यात सहभागी आहेत, हे नक्की. पण आशयचे ह्या विषयातील काम आणि नेतृत्व विशेष कौतुकास्पद आहे.स्वयं टीम मधील हे वातावरण, काम करण्याची पद्धत, दृष्टिकोन हे सगळं मला वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही कारणांसाठी फार महत्त्वाचं आहे. आयुष्यातल्या इतर अनेक बाबींसाठी स्वयं मुळे नवे benchmarks set करावेसे वाटले. काही रूढ गोष्टींचा पुनर्विचार करावासा वाटला, केला. व्यवसायातील नेहमीचे प्रश्न सोडवण्यासाठी नविन पद्धती मिळाल्या. ज्या पद्धतीने तिथे काम होतं, तसं इतर ठिकाणी झालं तर मख्खन टाइप अनुभव सगळीकडे घेता येऊ शकतो. हे भारी feeling आहे.
When human values, family values form the core, you won't need preaching of professional ethics, explicitly. हे स्वयं मध्ये शिकायला मिळालं.समीर आणि मी सुरुवातीपासून नव्हतो. २०१७ च्या पुणे स्वयं च्या काही महिने आधी आलो. समीरच्या स्वभावामुळे अशा चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात. मजा येईल, आनंद वाटेल, समाधान मिळेल, ह्या भावनेतून ठरवलं की आपण करूया हे पुण्यात. तसंच झालं. पुण्यातल्या तो कार्यक्रम झाल्यावर जे वाटत होतं ते फार मस्त होतं. घरात धार्मिक कार्यक्रम पार पडल्यावर जसं वाटतं ना, तसं काही तरी. प्रत्येक वेळी तसं वाटतं.मूळ कल्पना, हेतू, value system हे चांगलं आहे तर ते मोठं होण्यासाठी पूर्ण प्रयत्न झाला पाहिजे, आपण मोठ्या scale चा विचार सतत केला पाहिजे. स्वयं बद्दल ऐकल्यापासून हे वाटत आलं आहे. अनेक लोकांचा स्वयं वर असलेला विश्वास, प्रेम, ह्यामुळे स्वयं आहे. Scale-up साठी आवश्यक असलेलं operational model, track record देखील आता आहे. मोठी झेप हे एक आव्हान असेल, पण आता ते भितीदायक नक्की वाटत नाही. कारण पाया भक्कम आहे. पुढील प्रवासात आणखी खूप मजा येईल !
- मंगेश वाघ
लेखक हे स्वयं टॉक्स Team चे सदस्य आहेत.