'स्वयं' वक्ता ते 'स्वयं' सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग ३) - Welcome to Swayam Talks
×

‘स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग ३)

पुष्कर औरंगाबादकर

पुष्कर औरंगाबादकरने 'स्वयं'वक्ता होण्याच्या त्याच्या काही आठवणी मागच्या दोन भागात आपल्याला सांगितल्या. या शेवटच्या भागात तो सांगतोय....तुम्हीच वाचा !
 

Published : 29 June, 2020

‘स्वयं’ वक्ता ते ‘स्वयं’ सेवक होण्याचा माझा प्रवास ! (भाग ३)

पुष्कर औरंगाबादकरने  'स्वयं'वक्ता होण्याच्या त्याच्या काही आठवणी मागच्या दोन भागात आपल्याला सांगितल्या. या शेवटच्या भागात तो सांगतोय….तुम्हीच वाचा !
आणि 'तो' दिवस उजाडला. 
संध्याकाळी माझा स्वयं Talk होता. 
खरं म्हणजे मला त्या Talkचं काहीच टेन्शन नव्हतं. टेन्शन होतं ते त्या नंतर होणाऱ्या मुलाखतीचं. बेधडक- रोखठोक मुलाखत घेणारे सर्व क्षेत्रातील अनुभव असणारे डॉ. उदय निरगुडकर उत्स्फूर्त मुलाखत घेणार होते ! खरंतर IIM च्या वेळेस झालेला Interview आठवला तरी पोटात गोळा येत होता !  तेवढ्यात नविनचा फोन आला..
"पोचलो रे आम्ही पुण्यात.. तू ऑडिटोरियमला ४ पर्यंत ये!"
"Yes Boss! आज कार्यक्रमानंतर सगळ्यांनी माझ्या घरी जेवायला यायचंय.. लक्षात आहे ना?"
"Yes येतोय आम्ही..!

"मी ४ वाजता ऑडिटोरियममध्ये पोहोचलो तेव्हा सगळे जण मस्त हसत खेळत स्वयंचं व्यासपीठ उभं करत होते. मी पटकन माझं सामान ठेवलं आणि मदत करायला पुढे आलो.. पण मला कोणीच काहीच काम करू देईना! "सर.. तुम्ही स्वयं स्पीकर आहात.. तुम्ही काम नाही करायचं..

"मी शेवटी नविनला गाठलं.. मी काय बोलणार हे नविनने माझ्या डोळ्यात टिपलं असावं आणि मी काही बोलायच्या आत त्याने विषय बदलला, "अरे तुझ्यासाठी आज कार्यक्रम झाल्यावर एक जबरी suprise आहे!" मग काय ! कुठलंही लहान मूल जे करेल तेच मी केलं "Surprise!! काय रे?"
"hahahaha असं आधीच सांगितलं तर कसलं surprise" म्हणत नविन पिट पाशी निघून गेला..

मग मी आपलं सवयीप्रमाणे audience मध्ये फिरून, audience viewचा अंदाज घेऊ लागलो. श्रोत्यांना आपण स्टेजवर कसे दिसणार आहोत हे जाणून घेण्यासाठी मी हे नेहमी करतो. अशाने Audience बरोबर संवाद साधताना focus कसा द्यायचा किंवा axis कशी maintain करायची याचा अंदाज येतो. माझ्या भाषणात मी कीर्तन करणार असल्याने माझा आणि वाद्यांचा sound check झाला. तेवढ्यात शिल्पा आली आणि म्हणाली "तुझा slot सगळ्यात शेवटी आहे.. तू आजचा Show Stopper आहेस!" मी मनातल्या मनात म्हणलं कदाचित माझी मुलाखत ऐकल्यावर कोणाला फार वेळ थांबावंसं वाटणार नाही त्यामुळे नियतीनेच मला आज भैरवी दिलेली दिसतीये..

मग गेस्ट रूम मध्ये आलो. हळूहळू खोली भरू लागली. इतर दोन स्पिकर्स आल्या. स्वयंचे प्रसिद्ध स्पिकर्स प्रदीप लोखंडे, ज्ञानेश्वर बोडके, माया तुळपुळे असे सगळे दिग्गज येऊन भेटू लागले. थोड्या वेळानी निरगुडकर सर आले. गप्पा रंगल्या. मला मुलाखतीचं इतकं टेन्शन होतं की मी कोणाशीच फार काही बोलू शकलो नाही !

कार्यक्रम सुरु झाल्यावर आम्ही प्रत्येक वक्त्याने स्टेजवर कुठून यायचं, कुठे उभं राहायचं, कुठे बसायचं याची आमची एक छोटीशी रिहर्सल झाल्यावर आम्हाला पहिल्या रांगेत बसवण्यात आलं. पहिला talk झाला. दुसऱ्या स्पीकर सुजाता रायकर स्टेजवर आल्या आणि मी कीर्तनाचा पोशाख घालायला Green Room मध्ये गेलो. फेटा बांधला, धोतर नेसलं आणि स्वर बघायला तानपुरा लावून 'सा' लावला तोच कोणीतरी धावत आलं आणि सांगितलं आवाज बाहेर येतोय. सगळं आवरून आम्ही बाहेर आलो आणि सुजाता रायकरांना ऐकू लागलो. त्या 'थॅलिसिमिया' या आजाराविषयी बोलत होत्या. त्यांचा विषय ऐकतानाच मी भयानक भावुक झालो आणि माझे डोळे पाणावले.

त्यांचं सेशन संपलं आणि माझी AV सुरु झाली. त्यांचा विषय ऐकून मी इतका भावुक झालो होतो की  आपल्याला कुठून सुरु करायचंय हेच विसरून गेलो. मग मी विचार केला आपलीच जर अशी अवस्था झालीये तर श्रोत्यांचं काय झालं असेल! आपल्याला बोलण्यापूर्वी energy tone बदलावा लागणार हे लक्षात आलं. पण २० मिनिटांचं limit होतं. काय करावं?

AV संपली आणि मी चालत येऊन green circle मध्ये उभा राहिलो. श्रोत्यांच्या डोळ्यात बघितलं तर ते आधीच्या Talkच्या hangover मध्येच दिसले! त्यामुळे नमन झाल्यावर उदयजींना मजेत एक गोष्ट सांगतोय असा बहाणा करत एक छोटी गोष्ट सुरुवातीला add केली; आणि सगळ्यांना जोरात गजर करायला लावला. Energy catch झाल्यावर ठरलेला talk कसा सुरु झाला आणि संपला कळलं सुद्धा नाही. 

माझ्या मुलाखतीला सुरुवात झाली. तेव्हा अचानक Eureka झाला, "मुलाखतीला घाबरू नकोस. प्रामाणिक राहा सगळं व्यवस्थित होईल.." मुलाखत माझ्या Talk प्रमाणेच थोडी लांबली.. ती सोपी नक्कीच नव्हती पण माझ्या प्रामाणिकपणाने मला तारून नेलं. खरं म्हणजे मी आज तिला 'मुलाखत' असं नाही म्हणणार. त्या दिलखुलास गप्पा होत्या - माझ्या विचारांबद्दल, भावनांबद्दल, भूमिकांबाद्द्ल आणि अर्थात कार्याबद्दल! आजही जेव्हा लोकं दोन्ही videos बघतात तेव्हा मुलाखतीचं अधिक कौतुक करतात. "अरे तुझा स्वयंचा talk बघितला" म्हणणाऱ्यांपेक्षा "तुझी स्वयंची निरगुडकरांनी घेतलेली मुलाखत काय अफलातून आहे" असं सांगणारी लोकं मला आजही अधिक भेटतात - ३ वर्षांनंतर सुद्धा! All thanks to डॉ उदय निरगुडकर सर ! या लेखासोबत त्या मुलाखतीची लिंक दिली आहे. ती तुम्ही जरूर बघा, म्हणजे मी काय सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल. 

कार्यक्रम संपला आणि सगळी टोळी घरी आली.. दंगा, गप्पा, धिंगाणा सुरु झाला.. मी हळूच नविनला म्हणलं, "अरे ते surprise काय होतं?" असं म्हणल्याबरोबर "अरे खरंच की!!" असं म्हणत सगळे माझ्या भोवती गोळा झाले आणि इमाने इतबारे टाळ्यांच्या गजरात सगळ्या टोळीने माझ्या गळ्यात स्वयं टीमचं i-card घातलं; आणि 'एकदाचं' मला या शहाण्या वेड्यांच्या टोळीत सामील करून घेतलं! त्या रात्रीच बाबांनी जाहीर केलं कि इथून पुढे जोपर्यंत पुण्यात स्वयं होत राहील तोपर्यंत स्वयं झालं कि सगळ्यांनी श्रमपरिहारासाठी आणि निवासासाठी आमच्या घरी यायचं. आणि ते तसं घडत आलं देखील!

आज ३ वर्ष मी या शहाण्या वेड्यांच्या टोळीतला एक टोळकरी आहे! कळत नकळत मी सगळ्यांकडून खूप काही शिकलो आहे. आज एखादी नवीन गोष्ट करावीशी वाटली किंवा आयुष्यात कितीही विदारक परिस्थिती आली तरी ही माझी टोळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. कदाचित त्यामुळेच या टोळीमध्ये आल्यावर मला 'बळ' नव्याने गवसलं, नकळत माझं 'भय' विसर्जन पावलं आणि माझी स्वतःशी नव्याने ओळख होत गेली! त्यामुळे या माझ्या 'स्वयं' टोळकऱ्यांना आणि आम्हाला 'नविन' दिशा दाखवणाऱ्या आमच्या हक्काच्या वाटाड्याला माझा मनापासून…. 
पुढचं तुम्ही जे मनात म्हणालात तीच माझी भावना..!

पुष्कर औरंगाबादकर

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

Related blogs


 

पितृपक्ष आणि रिसायकलिंग

शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे

आता जोहराचं काय होणार?

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...

एका नव्या प्रवासाची नांदी

‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...