Get Better Each Week #7 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #7

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 28 July, 2023

Get Better Each Week #7

दुसरा मेंदू ! 

सकाळी जाग आली तीच बायकोच्या गोड मंजुळ - धमकीने !  

‘अरे वाजले किती ! झोपलायस काय अजून? आपल्या चिरंजीवांच्या शाळेत जायचंय ना आपल्याला ! 

आजही ओपन हाऊसला गेलो नाही ना, तर प्रिन्सिपल बोलावणारेत आपल्याला !’   

आज ओपन हाऊस होतं ? मी कंटाळत बेडमधून उठलो. ब्रश करून चहा प्यायला बसलो. समोरच्या पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग आर्टिकल दिसलं. पण ते पूर्ण वाचायला वेळ नव्हता. शॉवरखाली उभा राहिलो आणि येणाऱ्या आठवड्यात काय काय करायचंय त्याची एक यादी डोक्यात तयार होऊ लागली. सकाळी ओपन हाऊस - दुपारी ती वेब सिरीज बघायचीय - संध्याकाळी मित्रांची पार्टी - उद्या सकाळी ते पेपरमधलं आर्टिकल - उद्या दुपारी तो ब्लॉग लिहायचाय - संध्याकाळी…. 

मंगळवारी ही मिटिंग - गुरुवारी हा भेटणारे - शुक्रवारी पुण्याला जायचंय ..... 

पुढचा विकेंड उजाडला तरी यादीतल्या चाळीस टक्के गोष्टी राहिल्यात. पूर्ण आर्टिकल वाचायचं बाकी असलेला तो पेपर मला चिडवत तिथे बाजूलाच पडून होता.  

दोन दिवसांनी एका नावाजलेल्या कंपनीच्या चेअरमन सोबत मिटिंग होती. ती कंपनी त्यांनी अक्षरशः शून्यातून उभी केली होती. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या एका कंपनीचे प्रमुख असूनही ते फारच डाऊन टू अर्थ होते. आमची बोलणं सुरू असताना अधून मधून ते ऐकता ऐकता स्वतःच्या फोनमध्ये काहीतरी टाईप करायचे. मग थोड्या वेळाने पुन्हा आमचं बोलणं सुरु होई. मला हे जरा विचित्र वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ओळखून ते थोडे ओशाळले आणि म्हणाले - 

‘सो सॉरी ! मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. माझ्या मोबाईलवर मी वेगळं काही करत नाहीये. मी आपल्याच मिटींगच्या notes काढतोय.’ 

आता ओशाळायची वेळ माझ्यावर होती. 

कामाचं बोलून झाल्यावर मी म्हटलं, सर मघाशी तुम्ही notes काढत होतात…. इतक्या मोठ्या स्थानावर असताना तुम्ही अजूनही notes काढता?’ 

ते जोरात हसले आणि म्हणाले, मोठ्या स्थानावर आहे, म्हणून मी notes काढत नाही. मी notes काढतो म्हणून मी या स्थानावर आहे !’ आम्ही दोघंही हसलो. ते खूप मोठ्याने. मी काही कळलं नाही म्हणून !  

ते पुढे सांगू लागले. ‘मला फोटोग्राफीची आवड आहे. Notes काढणं हे मला त्या क्षणाचा फोटो काढल्यासारखं वाटतं. समोरचा माणूस बोलत असताना गप्पांमध्ये पटकन एखादं छान वाक्य येतं. आयडिया येते. पुस्तक, सिनेमा, माणसं, ठिकाण असे संदर्भ येतात. नंतर मग ते जाम आठवत नाही ! काय होतं? कोणी सांगितलेलं? दहा वर्षांपूर्वी मी खूप वेंधळा होतो. खूप काही माहित असायचं पण ते लक्षात राहायचं नाही. एकदा एका मोठ्या उद्योगपतीबरोबर दहा मिनिटांची मिटिंग होती. त्या दहा मिनिटांसाठी सुद्धा स्वतःसमोर पॅड आणि पेन घेऊन नोट्स काढत होते. त्यावेळी मी देखील तुमच्यासारखंच त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला David Allen चं एक वाक्य सांगितलं होतं - Your mind is for having ideas, not for holding them!  मग काय ! स्वतःला सवय लावली. त्याविषयी खूप वाचत राहिलो. Note taking या गोष्टीला पाश्चात्त्य जगात कमालीचं महत्त्व आहे. लहानपणी स्मरणशक्ती स्पर्धांमध्ये भाग घेतलेले आपण या स्पर्धा जिंकलो कधीच नव्हतो हे मात्र विसरतो ! आपण आपल्या स्मरणशक्तीवर खूप अवलंबून राहतो. गोष्टी लिहून ठेवायचा कंटाळा करतो. पण खरी मेख गोष्टी लिहून ठेवण्यात नसून हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळण्यात आहे. मी हल्लीच एक जबरदस्त पुस्तक वाचलं - Building a Second Brain !’ 

Tiago Forte with his Book

असं म्हणून हसत हसत त्यांनी एक पॅड आणि पेन माझ्यासमोर सरकवलं. 

‘Tiago Forte हा त्याचा लेखक आहे. तो म्हणतो, आताच्या डिजिटल काळात तुम्ही निरनिराळ्या Apps चा उपयोग करून ‘दुसरा पर्यायी मेंदू’ निर्माण करा. तुमच्या डोक्यातला मेंदू माहिती साठवण्यासाठी न वापरता त्याचा उपयोग नव्या कल्पनांवर विचार करण्यासाठी करा. माहिती साठवण्यासाठी त्या ‘डिजिटल’ second brainचा उपयोग करा. माहिती कशी साठवायची यासाठी त्याने जी system सांगितली आहे, ती आहे - 

CODE ! म्हणजेच  Capture - Organize - Distill - Express ! - CODE ! 

Image courtesy: Astar Studio

अर्थात हे सगळं तुम्हाला मुळातून वाचावं लागेल. मी फक्त तोंडओळख करून दिली.’ ते हसतहसत म्हणाले.  

मी त्यांचे आभार मानून घरी परतलो. 

गेले काही दिवस Notes taking, Building a Second Brain याबद्दल इंटरनेटवर अधाशासारखं वाचतोय. YouTube नावाचं विद्यापीठ तर या व्हिडीओजनी दुथडी भरून वाहतंय. स्वतः Tiago Forte, Ali Abdal यांचे या विषयावरचे अनेक व्हिडीओज मी पाहिले. विशेष म्हणजे, आता माझा दुसरा मेंदू होण्यासाठी Notion, Evernote, Readwise, Roam Research अशी अनेक Apps अक्षरशः सज्ज आहेत ! या Apps ची प्रत्येकाची आपापली features आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या Apps वर तुम्ही notes काढू शकता, तुमच्या सोयीप्रमाणे त्यांना organize करू शकता, तुमच्या सोयीने ते retrive करू शकता. त्यांना एकमेकांशी connect करू शकता. 

माझी इतकीच विनंती की तुम्ही ही सर्व Apps स्वतः वापरून पाहा. तुमचं काम, तुमच्या कामाची पद्धत या सगळ्याचा विचार करता तुम्हाला यातलं काय suit होतंय ते पाहा. हे सगळं वापरायला कठीण वाटत असेल तर चक्क डायरी पेन वापरा. काय tool वापरताय हे महत्त्वाचं नाही. फ्रेश कल्पनांचा जन्म होण्यासाठी तुमच्या डोक्यातलं मेंदू नावाचं ते ‘दैवी प्रसूतिगृह’ कायम सुसज्ज ठेवताय ना, हे जास्त महत्त्वाचं आहे !  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

कल्पनाशक्तीची नवी 'LINE'

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला...