Get Better Each Week #5 - Welcome to Swayam Talks
×

Get Better Each Week #5

नविन काळे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल याची आम्ही खात्री देतो.
 

Published : 14 July, 2023

Get Better Each Week #5

Podcast of the Week - The Seen and The Unseen by Amit Varma

पॉडकास्ट ऐकण्याची एक वेगळी मजा आहे. दोन्ही ऑडिओ माध्यमे असल्यामुळे अनेकांना रेडिओ आणि पॉडकास्ट सारखेच वाटतात. पण या दोन माध्यमांत मूलभूत फरक आहेत. 

रेडिओ सर्वांसाठी असतो. पॉडकास्ट प्रत्येकासाठी असतो. 

रेडिओला ठराविक विषय नसतो. पॉडकास्ट ठराविक विषयांवर असतात. 

तुमच्या माहितीसाठी सांगतो, पॉडकास्ट हा शब्द (Apple) Pods आणि Brodcast या दोन शब्दांनी मिळून बनलाय. परदेशात अत्यंत लोकप्रिय असलेले हे माध्यम आता हळूहळू आपल्या देशात, आपल्या भाषेत रुजू लागलंय. आपल्या देशातल्या अशाच एका दर्जेदार पॉडकास्टबद्दल मला तुम्हाला आज आवर्जून सांगायचंय. 

या पॉडकास्टचं नाव आहे - The Seen and The Unseen with Amit Varma. पॉडकास्ट नियमित ऐकणाऱ्यांना किंवा पॉडकास्ट दुनियेची थोडीफार माहिती असणाऱ्यांना हे नाव नवीन नाही. पण ज्यांना माहीत नाही, त्यांना या पॉडकास्टबद्दल सांगायलाच हवे. हा पॉडकास्ट दर सोमवारी रिलीज होतो. यात वेगवेगळ्या विषयांवर अमित वर्मा तज्ज्ञ व्यक्तीबरोबर गप्पा मारतो असा याचा फॉरमॅट आहे. २०१७ पासून सुरु झालेल्या या पॉडकास्टचे आजवर ३३७ भाग झाले आहेत आणि मुख्य म्हणजे कोरोनामध्येही हा पॉडकास्ट अखंड सुरु होता. 

मी स्वतः हा पॉडकास्ट का ऐकतो आणि मी तुम्हाला हा पॉडकास्ट का recommend करतोय? 

Amit Varma

१. खुद्द अमित वर्मा: हा एक भन्नाट होस्ट आहे. त्याचं स्वतःचं प्रचंड वाचन आहे. तो फक्त प्रश्न विचारत नाही. आलेल्या पाहुण्यांबरोबर तो स्वतःदेखील खूप बोलतो. त्याचं बोलणं ऐकण्यासारखं असतं. पाहुण्यांची एखादी गोष्ट पटली नाही तरी ते खुलेपणाने सांगण्याचं तो धाडस दाखवतो. ‘पॉडकास्ट हे तासाभरात संपले पाहिजेत’ या नियमाला तडा देत अमित वर्माचे पॉडकास्ट तासंतास चालतात. काही काही पॉडकास्ट चक्क सात-आठ तासाचेही आहेत (होय, बरोबर वाचलंय तुम्ही!). He believes in deep conversations. आणि त्यासाठी तो समोरच्याला (आणि स्वतःला) भरपूर वेळ देतो. 

२. विषयांची विविधता: यामध्ये आजवर हाताळले गेलेले विषय पाहिलेत तर तुम्हाला विषयांच्या रेंजचा अंदाज येईल. भारताचे अर्थशास्त्र, सरकारी धोरणे, गांधी, बदलत गेलेले क्रिकेट, कोरोना, हिंदुत्व, गीता प्रेसची अनोखी गोष्ट, कविता, जागतिक भाषा, पर्यावरण, राजकारण, समाजकारण, सिनेमा, नवीन आलेली पुस्तकं अशा अनेक विषयांवर ऐकता येतं. सात-आठ तासांचा पॉडकास्ट ऐकून एखाद्या पुस्तकाचा ऐवज तुम्हाला मिळतो. त्यामुळे दर आठवड्याला एक नवीन पुस्तक वाचल्याचं समाधान तुम्हाला मिळतं. दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन विषय कळतो.     

३. माणसांची विविधता: नेहमीच्या माध्यमांमधून तीच तीच माणसं आपल्या समोर येत राहतात. अमित वर्माच्या पॉडकास्टमुळे आपल्याच देशातली इतकी हुशार आणि विविध माणसं दर आठवड्याला आपल्याला भेटतात की आपण थक्क होऊ जातो. अशी माणसं की हा पॉडकास्ट ऐकला नसता तर ही माणसं आपल्याला भेटली नसती. प्रशासकीय अधिकारी, लेखक, विचारवंत, कवी, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, भाषातज्ज्ञ आणि असे कोण कोण ! 

४. Super Rich Content: वेळेचं बंधन नसल्यामुळे माणसं इथे सैल होतात. आठवणींमध्ये रमतात. विचार करून उत्तरं देतात. माणसांची जडणघडण कळते. अमुक परिस्थितीत माणसं कसा विचार करतात ते कळतं. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे लोकांचे किती वेगवेगळे दृष्टिकोन असतात हे कळतं. यामुळे एक वेगळ्या प्रकारची सहिष्णुता आपल्यात येते. हुशार माणसं बोलतात कसे, विचार कसा करतात, दुसऱ्याचं कसं ऐकतात, जगाकडे पाहाण्याची त्यांची समज या सगळ्याच्या मास्टरक्लास म्हणजे हा पॉडकास्ट ! आणखी एक बोनस म्हणजे, तुम्हाला तुमचं इंग्लिश चांगलं करायचं असेल तरीही हा पॉडकास्ट ऐकत राहा ! 

५. Talking Points: हल्ली अनेक लोकांना भेटल्यावर लक्षात येतं की यांच्याकडे बोलायला फारसे विषयच नाहीत. पण या पॉडकास्टमुळे तुम्हाला इतरांशी बोलायला भरपूर इंटरेस्टिंग विषय मिळतात. You get opportunity to pass on your enrichment to someone. 

६. Show Notes: प्रत्येक पॉडकास्टच्या खाली त्याच्या show notes असतात. याचा अर्थ त्या पॉडकास्टमध्ये जितक्या महत्त्वाच्या गोष्टींवर /मुद्द्यांवर चर्चा झाल्या, त्याच्या लिंक्स त्यात दिलेल्या असतात. कधीकधी या show notes च इतक्या इंटरेस्टिंग असतात, की एक अख्खा दिवस या show notes वाचण्यातच जातो. 

७. Convenience of Medium: आपण पॉडकास्ट कधीही कुठेही ऐकू शकतो. काही रुटीन कामं करतानाही आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. रोज मॉर्निंग वॉक करताना आणि लांबच्या प्रवासात मी हा पॉडकास्ट ऐकतो. हा संपूर्ण पॉडकास्ट एका दमात ऎकणेही शक्य होत नाही. पण हल्लीच्या App वर असलेल्या सोयीमुळे तुमच्या ऐकण्याचे ‘बुकमार्किंग’ करणे सोयीचे होते. 

अमित वर्माचे मी आत्तापर्यंतचे सर्वच्या सर्व पॉडकास्ट ऐकलेले नाहीत. (ते या जन्मात ऐकून संपवायचे आहेत, अशी एक बकेट लिस्ट मात्र नक्की आहे !) पण मला आवडलेले काही भाग खास तुमच्यासाठी recommend करत आहे. जमल्यास ते ऐका, किंवा पूर्णपणे नवीन भाग ऐका. - चिन्मय तुंबे, जेरी पिंटो, हर्षा भोगले, वरुण ग्रोव्हर, अभिनंदन सिक्री, रोशन अब्बास-विक्रम साठे, रोहिणी निलकेणी, राहुल रामगुंडम, अक्षया मुकुल (गीता प्रेस), निखिल मेनन, जय अर्जुन सिंग-सुब्रत मोहंती..... आणि असे अनेक ! 

जाता जाता एक छोटीशी गोष्ट. लांब पल्ल्याचे पॉडकास्ट ऐकण्यासाठी मेंदूत एक वेगळा स्नायू निर्माण करावा लागतो आणि त्याला बळकटी आणावी लागते. सुरुवातीला कदाचित कंटाळा येईल. पण चिकाटीने ऐकत राहिलात तर you will just enjoy listening podcats ! अमित वर्माचे The Seen and the unseen मधला तुम्हाला कुठला पॉडकास्ट आवडला हे नक्की कळवा. 

https://seenunseen.in/ या वेबसाईटवर तुम्हाला हे पॉडकास्ट ऐकता येतील. याशिवाय हे पॉडकास्ट iTunes आणि Spotify वर देखील उपलब्ध आहेत. 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...