कल्पनाशक्तीची नवी 'LINE' - Welcome to Swayam Talks
×

कल्पनाशक्तीची नवी ‘LINE’

ऋषिकेश लोकापुरे

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला सौदी अरेबियामध्ये कृतीत उतरवले जात आहे.
 

Published : 24 May, 2024

कल्पनाशक्तीची नवी ‘LINE’

#Get Better Each Week 48

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ।।

लहान असताना ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत शेकडोवेळा ऐकलं असेल. ह्या गाण्यात राजा मंगळवेढेकर ह्यांनी कल्पनाशक्तीची परिसीमा गाठली होती. एक बांगला जो चॉकलेट, गोळ्या आणि टॉफीने बनला होता. मुलांना आणि प्रौढांना ह्या गाण्याने एका गोड-सफारीचा आनंद दिला होता. 

कल्पनाशक्ती जादुई असते. ती नवे क्षितिज दाखवते आणि त्या पलीकडे काय असेल ह्या विचारात पाडते. अशाच एका अद्भुत विचाराला सौदी अरेबियामध्ये कृतीत उतरवले जात आहे. The Line च्या प्रचारात्मक सादरीकरणांमध्ये अकल्पनीय असे चित्र रंगवले जात आहे जे रेड सीच्या समीप असलेल्या अकाबाच्या आखातापासून अंतर्गत प्रदेशापर्यंत पसरले आहे.  

रेड सीला लागून प्रचंड मोठे वाळवंट आहे. हा परिसर आत्तापर्यंत उजाड समजला जायचा. पण सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ ह्यांच्या पुढाकाराने एका अकल्पनीय प्रकल्पाचे काम जोमाने सुरु आहे. इथे “The Line” नावाचे शहर घडवले जात आहे. १००% नूतनीकरणीय ऊर्जेवर चालणारे हे शहर, नव्या जगातील आश्चर्य मानले जाईल इथपत तंत्रज्ञानाचा वापर येथे होत आहे. 

आपण वाळवंटाची सफर ऐकली असेल पण वाळवंटात निसर्ग निर्माण करणे हे इथे अनुभवता येईल. पृथ्वीच्या आरोग्याशी तडजोड न करता अत्याधुनिक प्रगती कशी करता येईल ह्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. 

The Line ही १७० कि. मी. मध्ये पसरलेले एक क्रांतिकारी अखंडित शहरी रचना असेल. एवढे भव्य असूनही इथे एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत प्रवास करायला फक्त २० मिनिटे लागतील . ही रेखीय (Linear) शहर रचना आपल्या जमिनीच्या ९५% भागाला नैसर्गिक राखीव क्षेत्र म्हणून जपून ठेवणार आहेत. सुमारे ९० लाख लोकं इथे कामानिमित्त किंवा कायमस्वरूपी राहू शकतील अशी सोय येथे असेल. 

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार आणि पेपरमिंटचे अंगण होते, जणू कल्पकतेची परिसीमाच. The Line मध्ये तंत्रज्ञानाची आहे कारण इथे उडणाऱ्या टॅक्सी, AI वापरणारे स्वचालित वहाने, आणि आरश्यासारख्या दिसणाऱ्या इमारती असतील. सौदी अरेबिया हा उष्ण प्रदेश असल्याने इथे हवामान नियंत्रण करण्याचीही यंत्रणा असेल. 

सन २०१७ पासून सौदी अरेबिया हे महाआकाराचे शहर विकसित करत आहे. या देशाने आधीच असे शहर उभारण्यासाठी किमान ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. कल्पनाशक्ती मधल्या शक्तीचं हे मुर्तिमंद उदाहरण म्हणता येईल. पण फक्त कल्पनेच्या जोरावर एवढं महाकाव्य रचता येऊ शकेल का ह्यावर दुमत आहे. ह्या नवीन शहराच्या नियोजनाबाबत तज्ञांनी नैतिक मुद्दे उपस्थित केले आहेत. काहींना अशी चिंता आहे की हे शहर मोठ्या प्रमाणात केले जाणार्‍या सुरक्षा सर्वेक्षण कार्यक्रमाचा भाग बनू शकेल. इतकेच नाही तर या प्रकल्पाला टीका करण्याबाबत असलेल्या कडक नियमांवरूनही काहींनी नैतिक आक्षेप घेतले आहेत.

वास्तवात The Line कशी दिसेल हे काळच सांगेल, तसं बघितलं तर काळ ही पण एक Line असते. मानवाची उत्पत्ती असेल किंवा आगीचा शोध, शेती असेल किंवा चाकाचे निर्माण, सूर्यमंडळापलीकडे गेलेले व्हॉयेजर असेल किंवा God Particle शोधणारा Cern असेल, कल्पनाशक्तीच्या जोरावर अनेकांनी जगामध्ये परिवर्तन घडवून आणले, माणूस असल्याचे फायदे समजावून दिले आणि स्वयंच्या शोधात निघालेल्या माणसाला जेवढं बाहेरचा जग दाखवलं तेवढंच अंतर्मुख केलं. 

मंगळवेढेकर लिहितात, “चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो”. एक दिवस जर चंद्रावर आपला ठसा उमटवायचा असेल तर मुलांना आधी तो चांदोबा आपलासा वाटला पाहिजे. चॉकलेटचा बंगला असो किंवा The Line, कल्पनेला नवे पंख फुटणे महत्वाचं.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

देणगी काहीतरी सुचत राहण्याची!

सर्जनशील असणं याची मुभा सगळ्यांना आहे. आपण एखाद्या गोष्टीचा विचार कसा करतो? आणि त्याचा अवलंब कसा करतो? यावर सारं अवलंबून...

आसामच्या 'लक्ष्मी माँ': पद्मश्री लखिमी बरूआ

आसाम सारख्या दुर्गम भागातील राज्यात महिला सक्षमीकरण आणि सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात...

स्वप्नाचे अंतर मिटवणारा: मडू

गायकाने अगदी नजाकतीनं एखादा राग घेऊन त्यातली सौंदर्यस्थळं दाखवत मैफिल सजवावी तसाच जिवंत अनुभव इथे आपल्याला येतो....