HER नावाची गेल्यावर्षी एक फिल्म पहिली होती. एक लेखक त्याला लिखाणात मदत व्हावी म्हणून A.I. bot चा वापर करतो. त्यांच्यात वैचारिक देवाण-घेवाण होते आणि तो चक्क तिच्या प्रेमात पडतो. मानव आणि Technology मधील हे नातं अद्भुत वाटतं, आणि उत्तरं मिळण्यापेक्षा प्रश्नांमध्ये आपण हरवून जातो.
आणि महत्वाचं म्हणजे
Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. हॉलिवूडने ही वात सतत तेवत ठेवली आहे. यादी काढली तर superhero आणि alien एवढाच दर्जा robots ना आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलेले robots हे जगावर आलेले संकट दूर करणारे अशी त्यांची ओळख आहे. पण एखाद्या छोट्याश्या घरात एकटे राहणाऱ्या आजोबांना ४ वाजता आलं घालून चहा करायची मोहीम एखादा रोबोट तितक्याच सराईतपणे फत्ते करू शकेल का? किंवा एखाद्या single mother च्या महत्वाच्या meeting च्या वेळी तिच्या मुलांची काळजी घेणारी एखादी रोबोट असेल का? थोडक्यात मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला तर त्याने प्रश्न सुटतील का ते अजून वाढतील?
ही संकल्पना जेवढी सोपी वाटते तेवढीच गुंतागुंतीची आहे. Robots हे आजपर्यंत फक्त मोजकी आणि नेमून दिलेली कामं करू शकतात, पण माणसाच्या मनातले विचार अजून माणसांनाच कळत नाहीत तर robots ना ते कसे समजणार, रोबोट्सना नैतिक सीमा कोण सांगणार आणि त्या त्यांनी ओलांडल्या तर मग पुढे काय? आणि यक्षप्रश्न- robots जर स्वतःचा विचार करायला लागले तर मानवजातीचं आयुष्य सुखकर करायला तयार केलेले हे यंत्र मानवजातीच्या नाशाचे कारण झाले तर?
गेले काही वर्ष जगातील वेगवेगळ्या संस्था ह्यावर research करत आहेत. जपान मधील अनेक nursing homes आणि वृद्धाश्रमांमध्ये assistive robotics चा वापर केला जातो. SoftBank ने विकसित केलेल्या Pepper नावाचा रोबोट ५००हुन अधिक care-homes मध्ये आज socialising साठी वापरला जातो. तसंच PARO नावाचा रोबोट अपंग मुलांना therapy देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यात कार्यरत आहे. स्पेनसारखे देश ही ह्या तंत्रज्ञानात कमालीची गुंतवणूक करत आहेत. Science Robotics मध्ये प्रकाशित झालेले एक संशोधन असे दर्शवते की काही विशिष्ट रोबोट्स एकटेपणा कमी करायला मदत करू शकतात.
आज असे अनेक देश आहेत जिथे वृद्धांची संख्या अधिक आहे. बदलती जीवनशैली आणि वैद्यकीय प्रगतीचा हा एक दुष्परिणाम म्हणावा लागेल- आयुर्मान वाढले आणि एकटेपणाही! अशावेळी, आजाराने ग्रस्त आणि एकटे पडल्येला अनेक अबाल-वृद्धांना, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”, म्हणणारा समर्थ-रुपी आधार, रोबोटच्या रूपात दर्शन देईल का? हा उद्याचे भविष्य उलगडू शकणारा लखमोलचा प्रश्न आहे!