वर्ल्ड वाईड वेब खरंच वर्ल्ड वाईड आहे का? - Welcome to Swayam Talks
×

वर्ल्ड वाईड वेब खरंच वर्ल्ड वाईड आहे का?

ऋषिकेश लोकापुरे

जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसंच इंटरनेटही नव्या पिढीची गरज बनली आहे. आज आपण इंटरनेट च्या जगात वावरतो पण जगभर इंटरनेट पोहोचलं आहे का?
 

Published : 22 March, 2024

वर्ल्ड वाईड वेब खरंच वर्ल्ड वाईड आहे का?

Get Better Each Week #39

१९५०-१९६० च्या काळात अमेरिका आणि तेव्हाच्या सोव्हिएट देशात शीत युद्ध सुरु होतं. दोन्ही देशामधील प्रजा, सत्ताधारी आणि लष्कर प्रचंड तणावात होते. नुकत्याच घडलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या ठिणग्या आत्ता कुठेशी शमल्या होत्या. जगाने आण्विक शास्त्रांचे रौद्र रूप अनुभवलं होतं. चालू असलेलं शीत युद्ध कोणत्याही क्षणी भयावह अवतार घेऊ शकेल असं दोन्हीही देशांना वाटत होतं. 

अशावेळी अमेरिकेतील communication प्रणालीला धक्का लागू नये म्हणून शास्त्रज्ञ एका नव्या तंत्रज्ञानाचा विचार करू लागले. इंग्लंड मध्ये Elliott-NRDC 401 नावाच्या सुपरकॉम्पुटरची निर्मिती झाली, पण त्याचा वापर करायला संशोधक आणि शास्त्रज्ञांना लांबचा पल्ला गाठावा लागत होता. ह्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही जात होता. ह्यावर उपाय म्हणून time-sharing concept चा वापर सुरु झाला ज्यामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच computer चा वापर करता येऊ लागला आणि इंटरनेटचा जन्म झाला. पुढील ७ दशकांमध्ये इंटरनेटचं जाळं झपाट्याने पसरलं. हे सारं जरी असलं, तरी ही बाब संपूर्ण जगासाठी तेवढीच खरी आहे का? तर नाही! आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८०० कोटींपैकी सुमारे ५३५ कोटी लोकसंख्याच आज इंटरनेट वापरते. तेव्हा उर्वरित ३४% लोकसंख्येचं काय?

आपला विश्वास बसणार नाही पण जगात असे अनेक देश-प्रदेश आहेत जिथे internet अजूनही पोहोचलं नाहीये किंवा अत्यंत कमी speed ला ते चालतं. ह्यामध्ये प्रामुख्याने सहारा भागातील आफ्रिका, काही आशियायी देश, भारत आणि चीन मधील काही प्रदेश, तशाच पॅसेफिक महासागरातील काही बेटांचाही यात समावेश आहे. ह्याला या प्रदेशांची आर्थिक परिस्थिती, भौगोलिक स्थिती, इथे राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, सुरक्षेच्या दृष्टीने काही संवेदनशील प्रश्न किंवा global politics अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. कारणं काहीही असोत, internet चा मूळ हेतू right to equal access of information असल्याने जगभर सर्वांना समान वापर करता आला पाहिजे की नाही ह्यावर अनेक वर्ष वाद-विवाद सुरु आहेत.   

अनेक व्यवसाय ह्यामध्ये सकारात्मक बदल आणण्यात कार्यरत आहेत. गूगल आणि फेसबुक सारख्या दिग्गजांनी ह्यावर विचार केला आहे आणि काही प्रमाणात समुद्राखालील केबल्सच्या साहाय्याने ते यशस्वीही झाले आहेत, मात्र हे खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारी वेळेची आणि आर्थिक गुंतवणूक पाहून दोघांनीही ह्यामधून आज काढता पाय घेतलाय. पण डच सरकारचा पाठिंबा असलेली हायबर नावाची कंपनी ह्या मोहिमेवर गेली काही वर्ष कार्यरत आहे. आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांना शेतीपुरवठा अधिक सक्षम करता यावा म्हणून हायबरला अनेक मोठ्या उद्योगांचं पाठबळ आहे. त्यांनी समुद्री मार्गाच्या वापर करण्याऐवजी थेट आज अवकाश गाठले आहे. कृत्रिम उपग्रह वापरून जगाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे. ह्यांची कार्यप्रणाली विशेष आहे. हे कृत्रिम उपग्रह न थांबता पृथ्वीची प्रदक्षिणा घालत राहतात. त्यांचा वेग कमालीचा असल्यानं अखंडित internet सेवा मिळू शकते. तसेच गेल्या काही वर्षात चर्चेत असलेल्या एलॉन मस्क च्या स्पेस एक्सनं नुकतेच ४६ उपग्रह अंतराळात सोडले आणि इंटरनेट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी आशाही त्यांनी दर्शवली आहे.

इंटरनेट खरंच एवढं गरजेचं आहे का? 

आज आपण इंटरनेटच्या जगात वावरतो. असंही म्हणता येईल की इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसंच इंटरनेटही नव्या पिढीची गरज बनली आहे. पूर्वी विलासी समजली जाणारी इंटरनेट वापराची ही सवय आज अनेक कामं चुटकीसरशी करण्यास मदत करते. ज्यांना ही सेवा परवडते त्यांचा वेळ-पैसा वाचवायला आणि आयुष्य सुखकर बनवण्यास ती मदत करते. मग एवढ्या फायद्याची सेवा सर्वांना अनुभवता आली तर? ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने समाजात समानता नांदताना दिसेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही!

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...