हृदय 'प्रिंट' करण्याची 'हृदयस्पर्शी' Technology - Welcome to Swayam Talks
×

हृदय ‘प्रिंट’ करण्याची ‘हृदयस्पर्शी’ Technology

ऋषिकेश लोकापुरे

हा ब्लॉग म्हणजे तुमच्या मेंदूचा दर आठवड्याचा व्यायाम आहे! या ब्लॉगमुळे तुम्ही दर आठवड्याला काही नवीन तर शिकालच, पण जगापेक्षा एक पाऊल पुढे राहाल हे निश्चित!
 

Published : 16 February, 2024

हृदय ‘प्रिंट’ करण्याची ‘हृदयस्पर्शी’ Technology

Get Better Each Week #34

Printing हा शब्द काही आपल्या नवा नाही. गेली अनेक वर्ष घरी, शाळेत आणि office मध्ये या ना त्या कारणाने आपण सतत कागदावर prints काढत असतो. त्याचे upgraded version म्हणजे 3D printing. Three dimensional printing म्हणजे technology च्या साहाय्याने वस्तूचे तीन आयामी printing करणे. 

आपण जरी 3D जगात वावरत असू, तरी बहुतांश गोष्टी आपण 2D मध्ये पाहतो किंवा निर्माण करतो. आपल्या phone ची screen, television screen, cinema screen, पुस्तकं, वर्तमानपत्र - सगळं 2D. काही अपवाद वगळता आपण  2D विश्वातच रमतो असं म्हणायला हरकत नाही. पण जशी technology विकसित होत आहे, तसाच त्याचा वापरही. 

औद्योगिक क्षेत्रात 3D printing च्या वापराबद्दल तुम्ही ऐकलं असेल. काही वास्तूंचे '3D mockup' तुम्ही पाहिले असतील. एका माथेफिरूने तर ह्याचा वापर करून बंदूक बनवली अशी बातमीही वाचली असेल. पण हे तंत्र वापरून चक्क 'हृदयाला हात' घातल्याचं माहिती आहे का?

Israel च्या Tel Aviv University ने चार वर्षांपूर्वी माणसाचे हृदय 3D प्रिंट केले, तेही सर्व पेशिंबरोबर. आज जरी हे हृदय 'धक-धक' करत नसले तरी नुसत्या ह्या कल्पनेनं अनेकांच्या हृदयाचे ठोके नक्की चुकवले असतील. World Health Organisation च्या आकड्यांनुसार साधारण १५% लोकं हृदयरोगामुळे आपला जीव गमावतात. काही रोगांमध्ये heart transplant हा एकमेव पर्याय असतो. अशा वेळी '3D printed हृदय वापरता येईल का' ह्यावर जगभरात संशोधन चालू आहे. या आधीही अशाप्रकारचे प्रयोग मानवी अवयवांवर झाले आहे. Kidney आणि Liver चे 3D prototype वापरून यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.   

फोटो सौजन्य: The Week

MIT सारख्या जगविख्यात युनिव्हर्सिटीही ह्या research मध्ये सक्रिय आहेत. “Each heart is different”, हे जसं कवींना आणि philosophers ना कळले आहे तसेच शास्त्रज्ञांना सुद्धा. त्यावर काम करत संशोधकांनी 3D printing च्या साहाय्याने पेशंटचा नेमका आजार आणि body type लक्षात घेऊन customised heart print करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. गेल्यावर्षी त्यांनी मानवी हृदयासारखे दिसणारे आणि काम करणारे artificial हृदय यशस्वीपणे print ही केले. ह्या प्रगतीबद्दल वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मकता आहे. शरीरामधील इतर अवयव त्या हृदयाला 'आपलं' म्हणतील का हे समजणं महत्वाचं ठरेल.  

मानवी अवयव print करणे चांगले की वाईट?

प्रथमदर्शी सरळ वाटणारे उत्तर गुंतागुंतीचे आहे. ह्या printing साठी लागणारे raw material म्हणजे stem cells ! जे नवजात बाळाच्या नाळेमधून किंवा प्रौढांच्या bone marrow मध्ये असतात. ते मिळवणे, त्यांची काळजी घेणे, त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि खर्च ह्याचा अंदाज लावता ते काही सहज शक्य होणारे नाही. ते स्वेच्छेने दिले आहेत का बळजबरी करून, हे समजण्याचा आत्ता कोणताही मार्ग नाही; आणि सगळं झाल्यावर ते दुसऱ्या शरीरात match होईलच ह्याचीही काही शाश्वती नाही. 

पण हे सगळं आज माहित असलेल्या बाबींनुसार. आदिमानवाला जर कोणी सांगितलं असतं एक दिवस माणसाला उडता येईल, चंद्रावर जाता येईल किंवा समुद्राच्या तळाशी पोहोता येईल तर त्यानेही नकारघंटाच वाजवली असती.

पूर्वी थोर मोठे शेकडो-हजारो वर्ष तपस्या करून दैवी शक्ती मिळवू शकत. कठोर तपश्चर्या, एकाग्रता आणि निस्सीम विश्वासाने केलेल्या यज्ञानंतर त्यांना वरदान मिळत असे. बदललेल्या युगात आपल्याकडे ते ज्ञान जरी नसलं तरी तेव्हा रोवलेले बीज आज technology च्या रूपाने आपल्याला मिळालेलं वरदान समजले पाहिजे. ही technology इथून पुढे कुठेपर्यंत जाते हे पाहणे रंजक असेल.  

आपण कायमच असं म्हणत आलो आहोत की “त्याने आपल्याला घडवलं” पण ह्या technology च्या वापराने माणुसकी जपू पाहणाऱ्या माणसाला दैवी देणगीच मिळाली आहे असं वाटतं. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत सतत धावणारे हे घड्याळ जेव्हा ह्या technology बद्दल ऐकेल तेव्हा ‘दिल ढूँढता है, फिर वही, फ़ुर्सत के रात दिन’  हे गाणं  स्वतः गुणगुणेल का?

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...