स्वयं टॉक्स मुंबई २०२४ - Get Better in One Day! - Welcome to Swayam Talks
×

स्वयं टॉक्स मुंबई २०२४ – Get Better in One Day!

नविन काळे

Get Better Each Week #31 Get Better Each Week या ब्लॉग सिरीजमधून तुम्ही आजवर विविध विषयांवरील अनेक ब्लॉग्स वाचलेत. या ब्लॉगच्या निमित्ताने भन्नाट माणसं, बदलत जाणारी टेक्नॉलॉजी, पाहायलाच हवेत असे सिनेमा / वेबसिरीज, वाचायलाच हवीत अशी पुस्तकं तर कधी आयुष्य अर्थपूर्ण करणाऱ्या ideas तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न असतो.त्या प्रत्येक ब्लॉगमधून तुम्हाला काही ना काही ‘सापडलं’ […]
 

Published : 19 January, 2024

स्वयं टॉक्स मुंबई २०२४ – Get Better in One Day!

Get Better Each Week #31

Get Better Each Week या ब्लॉग सिरीजमधून तुम्ही आजवर विविध विषयांवरील अनेक ब्लॉग्स वाचलेत.

या ब्लॉगच्या निमित्ताने भन्नाट माणसं, बदलत जाणारी टेक्नॉलॉजी, पाहायलाच हवेत असे सिनेमा / वेबसिरीज, वाचायलाच हवीत अशी पुस्तकं तर कधी आयुष्य अर्थपूर्ण करणाऱ्या ideas तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न असतो.त्या प्रत्येक ब्लॉगमधून तुम्हाला काही ना काही ‘सापडलं’ असेल अशी मी आशा करतो.  

यावेळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या एका आगामी कार्यक्रमाबद्दल सांगणारे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबईत होणारा हा कार्यक्रम प्रत्यक्ष येऊन पाहावा. हा कार्यक्रम म्हणजे स्वयं टॉक्स मुंबई २०२४ ! रविवार २८ जानेवारी रोजी हा कार्यक्रम मुंबईतल्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. ‘स्वयं टॉक्स मुंबई’चे हे सलग अकरावे वर्ष आहे. 

ज्यांना ‘स्वयं टॉक्स’बद्दल माहित नाही अशांसाठी त्याबद्दल अगदी थोडक्यात. २०१४ साली ‘स्वयं टॉक्स’ची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी सात ते आठ माणसं इथे येऊन आकर्षक पद्धतीने त्यांचा प्रवास मांडतात. डॉ उदय निरगुडकर त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना अधिक बोलतं करतात. जगात नवीन काय घडतंय हे जाणण्याची जिज्ञासा असलेल्या रसिक-जाणकार मंडळींसाठी हा संपूर्ण कार्यक्रम एक श्रीमंत करणारा अनुभव असतो. विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योगपती, उद्योजक, कलाकार, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, रसिक अशा विविध प्रकारचे प्रेक्षक कार्यक्रमाची शोभा वाढवतात. 

२०२४ च्या ‘स्वयं टॉक्स’ मुंबईमध्ये काय घडतंय?  

नेहमीप्रमाणे याहीवेळच्या ‘स्वयं टॉक्स’मध्ये तुम्हाला एकाहून एक अशी आठ भन्नाट माणसं भेटणार आहेत. 

आपण सगळेच आवडीने गाणी ऐकत असतो. आपले आवडते संगीतकारही असतात. पण दैनंदिन आयुष्यातलं संगीत आपण कधी ऐकलं आहे का? आपल्या नकळत आपण शास्त्रीय संगीतच गुणगुणत असतो. याविषयी सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तन्मय देवचके बोलणार आहे. आणि हो ! त्याच्या टॉकबरोबर त्याच्या LIVE परफॉर्मन्स देखील असणार आहे ! 

Finance मधली अतिउच्च पदाची नोकरी सोडून एक तरुणाने एक वर्षाची sabbatical घेऊन ८ महिन्यांत योगा, नृत्य, पाककला, क्रिकेट, लेखन अशा ८ नव्या गोष्टींचे ज्ञान संपादन केले ! ही गोष्ट चकित करणारी असली तरी सत्य आहे. तो तरुण म्हणजेच स्वानंद केळकर ! स्वानंद त्याच्या अनुभवांविषयी बोलणार आहे.  

क्लाउड, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऍडव्हान्स ऍनालीटीक्स या क्षेत्रात मोठ्या उद्योगांना तसेच देशभरातील उदयोन्मुख व्यवसायांना सल्ला देण्याचा २३ वर्षांहून अधिक वैविध्यपूर्ण अनुभव असलेला चिन्मय गवाणकर Chat GPT या नव्या AI technology विषयी सांगेल तेव्हा प्रेक्षकांचे डोळे खाडकन उघडणारा अनुभव मिळेल यात शंका नाही!  

रोजच्या जीवनात आपण मराठीत बोलताना अनेक इंग्रजी शब्द सहज वापरतो हे आपल्याला माहित आहे. पण इंग्रजीसोबतच आपण अनेक फारसी भाषेतले शब्दही सर्रास वापरतो. फारसी भाषेचे संशोधन करणारा विद्यार्थी अश्विन चितळे फारसी भाषेच्या छटा उलगडणार आहे. ‘श्वास’ सिनेमातला तो कोकणातला छोटा मुलगा आठवतोय? तोच हा अश्विन चितळे !  

आधी टाइम्स ऑफ इंडियाच्या पुरवणीत लिखाण, मग solo traveling, फोटोग्राफी, जर्मन भाषेचे शिक्षण आणि शिकवणं, wedding photography या सगळ्या गोष्टी करत पैसे कमावणे आणि अनुभव कमावणे या दोन्हीचा तोल सांभाळणारी मुलगी म्हणजे आभा चौबळ! Work Exchange या एका अनोख्या माध्यमातून आभा जगाच्या कानाकोपऱ्यात एकटी फिरते. याच सोलो प्रवासाविषयी ती सांगणार आहे. 

आपल्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून आता सगळेजण फोटोग्राफर झालेत ! पण हा विषय वाटतो तितका सोपा नाही. मोबाईल फोटोग्राफी’मध्ये कौशल्य प्राप्त केलेले दोन गुणी फोटोग्राफर्स आपल्याला भेटायला येणार आहेत. एक आहे पुण्याचा अभय कानविंदे आणि दुसरा कणकवलीत राहणारा इंद्रजित खांबे. अभयची स्ट्रीट फोटोग्राफी इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे. इंद्रजितची मोबाईल फोटोग्राफी पाहून Apple कंपनीने इंद्रजितला भारतभर फिरून origin of  colours ही सिरीज करण्याचे काम दिले होते ! 

तर अशी ही भन्नाट आठ मंडळी…. एक मिनिट एक मिनिट ! मला वाटलंच तुम्हाला कळलं असेल. 

मी सात लोकांबद्दलच सांगितलं ! आठवी व्यक्ती कोण आहे ? मला माहित्ये तुम्ही विचारताय !   

तर मंडळी, आठवी व्यक्ती एक खूप मोठ्ठं सरप्राईज असणार आहे. जे प्रत्यक्ष बघायला येतील त्यांच्यासाठी तर त्या आठव्या व्यक्तीला भेटणं हा एक जबरदस्त अनुभव असणार आहे ! 

तेव्हा मंडळी, स्वयं टॉक्स मुंबई is going to be a super super fun ! 

अगदी मोजकी तिकिटं बाकी आहेत. तेव्हा पटकन तुमची तिकिटं बुक करून टाका. 

https://swayamtalks.org/swayamtalks-mumbai-2024/ या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या पसंतीची तिकिटं बुक करू शकता. 

आणि हो ! या संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण यावर्षी खूप अनोख्या पद्धतीने होणार आहे. ते काय आहे? कोण करणार आहे? हे तुम्हाला प्रत्यक्ष तिथे येऊनच कळणार आहे. दास्तान गोई हा उर्दूत रुळलेला साहित्यप्रकार ज्याने पहिल्यांदा मराठीत आणला तो अक्षय शिंपी या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन करणार आहे.  

महाराष्ट्रातील प्रसिद्ध मध्यमसमूह ‘सकाळ’ देखील यावर्षी स्वयं सोबत सह आयोजक असणार आहे.  

हा कार्यक्रम घडून येण्यासाठी ‘स्वयं’ची संपूर्ण टीम कित्येक महिने काम करत असते. अनेक लोकांचे हातभार लागतात तेव्हा कुठे हा एक कार्यक्रम उभा राहतो. या कार्यक्रमाचे प्रायोजक, तंत्रज्ञ, टीम, स्वयंसेवक, कलाकार, डॉ उदय निरगुडकर, सर्व वक्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित राहणारा प्रत्येक प्रेक्षक यांच्यामुळे स्वयं टॉक्स दरवर्षी करत राहण्याचे बळ मिळते. 

Get Better Each Week या ब्लॉगमधून तुम्ही दर आठवड्याला आधी होतात त्यापेक्षा उत्तम माणूस कसे व्हाल हाच आमचा प्रयत्न असतो. ‘स्वयं टॉक्स मुंबई’ पाहिल्यावर You will get better in One Day याची तुम्हाला खात्री देतो ! 

भेटूया २८ जानेवारीला! ‘स्वयं टॉक्स मुंबई’ मध्ये! 

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...