To Stay in Touch चा खरा अर्थ - Welcome to Swayam Talks
×

To Stay in Touch चा खरा अर्थ

ऋषिकेश लोकापुरे

Get Better Each Week #29 ‘अरे मित्रा, कसा आहेस? किती दिवसांनी भेटलास’, असं म्हणत काही मित्र घट्ट मिठी मारत रोज भेटायचे. तसंच, अनेक संस्कृतींमध्ये झप्पी पाले, गले मिलो, handshake, fist bump, गालगुच्चा घेणे, kiss देणे अशाही प्रथा आहेत. थोरामोठयांच्या पाया पडायचं आणि लहानांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याचं बाळकडू आपण पिढ्यांपिढ्या प्राशन करत आलो आहोत. […]
 

Published : 5 January, 2024

To Stay in Touch चा खरा अर्थ

Get Better Each Week #29

‘अरे मित्रा, कसा आहेस? किती दिवसांनी भेटलास’, असं म्हणत काही मित्र घट्ट मिठी मारत रोज भेटायचे. तसंच, अनेक संस्कृतींमध्ये झप्पी पाले, गले मिलो, handshake, fist bump, गालगुच्चा घेणे, kiss देणे अशाही प्रथा आहेत. थोरामोठयांच्या पाया पडायचं आणि लहानांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्याचं बाळकडू आपण पिढ्यांपिढ्या प्राशन करत आलो आहोत. ह्या सगळ्यामध्ये common काय? Human Touch!

Internet आणि AI च्या जमान्यात जिथे माणसाचा influence त्यांना हजारो virtual friends कडून मिळणाऱ्या आणि लाखो reactions वरून ठरवला जातो, तिथे human touch मधला human आणि touch दोन्हीही कालवश होताना दिसत आहे. हे बरोबर की चूक ह्याबद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करू; पण त्याच Internet आणि AI च्या जमान्यात, इलेक्ट्रिक Skin च्या मदतीने तुमचे मित्र, नातेवाईक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना physical human touch जाणवू शकेल अशा technology वर काम सुरु आहे. 

ह्या क्रांतिकारी विषायावर गेली काही वर्ष सातत्याने काम चालू होतं पण 5G आल्यानंतर ह्यावर वेगाने काम सुरु आहे. IoT च्या वापराने Education, Medicine, Social, Transport सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नवीन क्रान्ती संभवते. 

हे नेमकं घडतं कसं?       

AR/VR च्या मदतीने एक e-skin तयार केली जाते जी वापरून Tactile Sensations म्हणजेच स्पर्शिक संवेदना एका user कडून दुसऱ्या user पर्यंत पोहोचवता येऊ शकतात. 

एका printed circuit board च्या माध्यमातून आपल्या स्पर्शाचं digital version तयार केलं जातं. तो code आपल्याला पाहिजे त्या receiver (user) ला पाठवता येऊ शकते. हे सगळं real time आणि real like कसं होईल   ह्या विषयावर Honkong मध्ये गेल्या १० वर्षांपासून research चालू आहे. 

अनेक प्रसंगांमध्ये ह्या technology चा वापर होऊ शकतो. विचार करा तुम्ही एका अनोळखी जागी एकटे असाल आणि आजूबाजूला कोणीही नाही, फक्त जीवघेणी शांतता. मनात नाही नाही ते विचार घर करतात आणि चित्र विचित्र भास होऊ लागतात. अशावेळी, तुमच्या पाठीवर आईने मायेने फिरवलेला हात, बाबांनी खांद्यावर ठेवलेला हात, मित्रांनी विश्वाने दिलेली टाळी किंवा प्रियकराचा हातात घेतलेला हात किती आश्वस्त वाटेल. माणसं वेगळी, नाती वेगळी, प्रसंग वेगळे पण अतूट विश्वास मात्र तोच. 

Accident च्या वेळी Virtual Doctors, ज्या गावी शाळा नाहीत तिथे स्पर्शातून जाणवणारे गुरुजी, एवढंच काय तर येणाऱ्या काळात अंतराळ भ्रमंती करताना काही तांत्रिक बिघाड झालाच तर देवासारखे स्वतः उभे राहणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ - अनेक प्रसंगात e-skin चा वापर संभवतो. 

सर्वात महत्वाचं, या पुढे कोणीही एकटं पडणार नाही अशी दाट शक्यता असू शकेल. 

कोणतीही क्रांती ही मानवी अस्तित्व जपण्यासाठी आणि वारसा चालवण्यासाठी झाली आहे. पण या ही नाण्याची दुसरी बाजू असू शकेल. जशी चांगली माणसं तशी काही वाईट कृत्यांसाठी ही ह्या ह्याचा उपयोग करतील का हे वेळच सांगेल. 

अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर audio आणि visual माध्यमं वापरून आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण यश प्राप्त करू शकलो आहोत, पण आपल्याकडे अजून तीन ज्ञानेन्द्रीय आहेत - वास, चव आणि स्पर्श. 

अगदी पहिल्या क्षणापासून शेवटच्या सेकंदापर्यंत, मानवी जीवनात Human Touch ची प्रचिती होते. जशी real तशीच real-like! एक दिवस येईल जेव्हा आपण एका connected world मध्ये मुक्त संचार करत असू. त्या दिवशी आपण मनुष्य म्हणून खऱ्या अर्थाने समृद्ध झालो असू.  

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

पिप्लंत्री ग्रामदूत - पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल

'बेटी धनाची पेटी' हे आपण ऐकतो, वाचतो. पण हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी! त्यांनी...

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...